नवा खुलासा! कसाबला दिलं होतं हिंदू नाव, अरुणोदय कॉलेजचं तयार केलं होतं ओळखपत्र

नवा खुलासा! कसाबला दिलं होतं हिंदू नाव, अरुणोदय कॉलेजचं तयार केलं होतं ओळखपत्र

26/11च्या हल्ल्याला हिंदू दहशतवादाचं रुप देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हल्ल्याच्यावेळी कसाबच्या हातात गंडाही दिसत होता

  • Share this:

मुंबई, 18 फेब्रुवारी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया त्यांच्या आगामी Let Me Say It Now या पुस्तकामुळे चर्चेत आले आहे. या पुस्तकात त्यांनी शीना बोरा प्रकरणाचा तपास करीत असतानाच्या अनेक बाबींचा खुलासा केला आहे. या पुस्तकात त्यांनी मुंबईत झालेल्या 26/11 या दहशतवादी हल्ल्याबाबतही एक खळबळजनक खुलासा केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात अजमज कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं होतं.  पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना आएसआय (ISI) या हल्ल्याला हिंदू दहशतवाद्याचे रुप देऊ पाहत होती. माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात असा दावा केला आहे की, पाकिस्तानातील गुप्तहेर संघटना (ISI) 26/11 च्या हल्ल्यात हिंदू दहशतवाद्याचे रुप देऊ पाहत होती. या हल्ल्यातील 10 हल्लेखोरांना हिंदू सिद्ध करण्यासाठी त्यांच्यासोबत बनावटी ओळखपत्र पाठविण्यात आले होते. कसाबकडेही असंच एक ओळखपत्र सापडलं होतं. ज्यावर समीर चौधरी असं लिहिलं होतं. राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात हादेखील खुलासा केला आहे की 26/11 च्या हल्ल्यात हिंदू दहशतवाद दाखविण्याचा प्लान होता. सर्व दहशतवाद्यांना बनावटी हिंदू नावं, ओळखपत्र व हाताता गंडाही घालण्यात आला होता. शिवाय कसाबचं हैद्राबादमधील अरुणोदय कॉलेजचं ओळखपत्र तयार करण्यात आलं होतं. मात्र कॉलेजकडे विचारणा केली असता हे ओळखपत्र बनावटी असल्याचे समोर आले.

केव्हा झाली होती कसाबला फाशी

26 नोव्हेंबर 2008 रोजी 10 दहशतवाद्यांनी तीन जागांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो लोक जखमी झाले होते. या 10 दहशतवाद्यांमध्ये एक अजमल कसाब जिंवत पकडण्यात आला होता. कसाबला 21 नोव्हेंबर 2012 मध्ये पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.

मारिया यांचा शीना बोरा प्रकरणातील खुलासा

आपल्या 'Let Me Say It Now' या पुस्तकात राकेश मारिया यांनी लिहिले आहे की, मुंबई पोलिसाती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शीना बोरा हत्या प्रकरणासंबंधित एका महत्त्वपूर्ण माहितीपासून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लांब ठेवले. या प्रकरणात मारिया यांनी त्यांच्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिशाभूल केल्याचा आरोप फेटाळला आहे. या पुस्तकात मारिया यांनी प्रश्न उपस्थित केला की, महाराष्ट्र सरकारला मुंबई पोलीस आयुक्तांचे उत्तराधिकारी जावेद अहमद यांचे आणि पीटर मुखर्जींसोबतचे संबंध माहिती होते.

First published: February 18, 2020, 12:03 PM IST

ताज्या बातम्या