नवी दिल्ली, 06 मे : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आता शेवटच्या दोन टप्प्यांसाठी आपला मास्टर प्लॅन तयार केला आहे. देशात पाचव्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. पण, पुढील दोन टप्प्यांसाठी भाजपनं आता कंबर कसली आहे. पुढील दोन टप्प्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे जातीनं लक्ष घालणार आहेत. पुढील 10 दिवसांमध्ये नरेंद्र मोदी अमित शहा मोठ्या प्रमाणात रॅली घेत लोकांशी संवाद साधणार आहेत. या दोन टप्प्यांसाठी नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये वाढ करण्यात आली आहे. नव्या प्लॅननुसार पंतप्रपधान नरेंद्र मोदी दिवसाला 3 ते 4 सभा घेणार आहेत. तर, अमित शहा दिवसाला 5 ते 6 ठिकाणी लोकांशी संवाद साधणार आहेत. गडचिरोलीत नक्षलवाद्यांची हिंसा सुरूच; आणखी एका नागरिकाची निर्घृण हत्या पश्चिम बंगाल महत्त्वाचं पश्चिम बंगालमधील निवडणूक ही भाजपसाठी महत्त्वाची आहे. सहाव्या टप्प्यासाठी 12 मे रोजी 59 जागांसाठी मतदान होणार आहे. तर सातव्या टप्प्यासाठी 19 मे रोजी 59 जागांसाठी मतदान होणार आहे. पुढील दोन टप्प्यांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये 27 आणि पश्चिम बंगालमध्ये 25 जागांसाठी मतदान होणार आहे. लग्नाला जाताना काळाचा घाला; 5 जणांचा जागीच मृत्यू मोदी सर्वात व्यस्त नेते शेवटच्या दोन टप्प्यांच्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात व्यस्त नेते ठरले आहेत. कारण, 125 दिवसांमध्ये नरेंद्र मोदी यांनी तब्बल 200 सभा आणि रॅली घेतल्या आहेत. 25 डिसेंबरनंतर नरेंद्र मोदी यांनी सभांचा धडाका लावत लाखो लोकांशी संवाद साधला. यामध्ये सरकारी तसेच राजकीय कार्यक्रमांचा देखील समावेश आहे. देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीचा निकाल हा 23 मे रोजी लागणार आहे. तेज बहादुर यांचा दारू पितानाचा VIDEO व्हायरल, मोदींना दिलं होतं आव्हान