लग्नाला जाताना काळाचा घाला; 5 जणांचा जागीच मृत्यू

लग्नाला जाताना काळाचा घाला;  5 जणांचा जागीच मृत्यू

लातूरमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • Share this:

लातूर, 06 मे : लग्नसमारंभासाठी जाताना सोनकांबळे कुटुंबीयांवर काळानं घाला घातला. अमदपूर तालुक्यातील विळेगाव येथे एका लग्नसमारंभासाठी सोनकांबळे कुटुंबीय आपल्या पिकअप ऑटोमधून जात होते. त्यावेळी भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पोनं पिकअप ऑटोला धडक दिली. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. जळकोट तालुक्यातील धामणगाव पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. ऑटोला टेम्पोनं धडक दिल्यानंतर टेम्पोचालक फरार झाला. यामध्ये पुष्पा ज्ञानोबा सोनकांबळे ( 55 वर्षे ) ज्ञानोबा सुदाम सोनकांबळे ( 60 वर्षे ) कांता बळीराम सोनकांबळे ( 60 वर्षे ) ऑटोचालक अरविंद बळीराम सोनकांबळे ( 25 वर्षे ) पूर्वी सोनकांबळे ( 5 वर्षे ) यांचा मृत्यू झाला. तर, सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जळकोट येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सध्या पोलिस फरार चालकाचा शोध घेत आहेत. या अपघातानंतर विळेगाव येथे शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेगाचे बळी

भरधाव वेगानं येणाऱ्या टेम्पोनं धडक दिल्यानं पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे वेगाचे बळी असल्याचे प्रतिक्रिया सध्या अपघाताच्या ठिकाणी आहे. रस्त्यावर देखील आवरा वेगाला सावरा जीवनाला अशा प्रकारचे फलक लावलेले असतात. पण, त्यानंतर देखील चालक या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. पण, याच वेगामुळे आता सोनकांबळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


SPECIAL REPORT: पृथ्वीवर धडकणार धूमकेतू?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2019 09:12 AM IST

ताज्या बातम्या