नवी दिल्ली, 14 मे : कोरोना व्हायरसचं संक्रमण टाळण्यासाठी देशात 30 जूनपर्यंत प्रवाशांसाठी ट्रेन बंद ठेवण्यातचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी तिकीट बुकिंग केलं आहे त्या सर्वांना ते लवकरच वर्किंग डेमध्ये रिफंड करण्याची सुविधा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. 30 जूनपर्यंत केवळ श्रमिक ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती आता मिळाली आहे. भारतीय रेल्वेनं 12 मेपासून स्पेशल ट्रेन सुरू केल्या आहेत. डिब्रूगढ, आगरताळा, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगांव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू या ठिकाणी रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकऊनमुळे गेल्या 50 दिवसांपासून रेल्वेसेवा बंद होती. यामुळे हजारो प्रवासी अडकले होते. रेल्वेकडून 10 मे ला स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता 30 जूनपर्यंत केवळ श्रमिकांसाठी ट्रेन सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. रेल्वेकडून 30 जूनपर्यंत तिकीट बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना पैसे रिफंड मिळणार आहेत. असंही सांगण्यात आलं आहे.
रेल्वेकडून काढण्यात आली होती सूचना…
Railway notification by Saad Bin Omer on Scribd
प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या दीड तास आधी स्टेशनवर पोहोचण्यास सांगण्यता आलं आहे. स्टेशनवर प्रत्येक प्रवाशाचं थर्मल स्क्रीनिंग केलं जात आहे. स्टेशनच्या गेटवरच सॅनिटायझर मशीनही लावलं आहे. सध्या रेल्वेनं 12 ते 20 मेपर्यंत सुरू असलेल्या गाड्यांची यादी दिली आहे. यामध्ये फक्त वातानुकूलित श्रेणीचे डबे असतील. हे वाचा : राज्यात Lockdown 4.0 अटळ; आरोग्यमंत्र्यांनी दिला रुग्णवाढीचा इशारा! हे आहे कारण कोरोना व्हायरसमुळे ट्रेनमधून प्रवास कऱताना काही नियम बदलण्यात आले आहेत. प्रवाशांना कांबळ, चादर, टॉवेल दिला जात नाही. एसीच्या तापमानाबाबतही काही नियम कऱण्यात आले आहेत. तापमान थोडं जास्त ठेवण्यात येणार आहे. हे वाचा : ऑनलाइन दारू खरेदीसाठी असं मिळतं ई टोकन, नोंदणी करण्यात पुणेकर आघाडीवर