पुणे, 13 मे : देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 24 मार्चपासून लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. दरम्यान, तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सरकारने नियम शिथिल केले. यातच दारु दुकानेही सुरु करण्याचा निर्णय़ घेतला गेला. मात्र दुकानांसमोरची गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई टोकन पद्धत सुरु केली आहे. या ई टोकनचा पुणेकरांनी मोठा लाभ घेतला. मंगळवारी एकाच दिवसात तब्बल 10 हजार 877 पुणेकरांनी ऑनलाईन दारु खरेदीसाठी नोंदणी केली.
ई टोकन सुविधा www.mahaexcise.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे. दारु खरेदी करणाऱ्यांना या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करून ई – टोकन घ्यावं लागतं. यासाठी ग्राहकांना त्यांचा मोबाईल नंबर आणि नाव ही माहिती द्यावी लागते.
नाव आणि मोबाईल नंबर दिल्यानंतर जिल्हा, पिनकोड इत्यादी माहिती भरावी लागते. त्यानंतर सबमिट बटन क्लिक केल्यानंतर ग्राहकांना दारुच्या दुकानांची यादी मिळते. त्यात जवळपास असलेल्या दुकानांची माहिती असते. त्यातील एका दुकानाची निवड करून ग्राहकांना तारीख आणि वेळही निश्चित करता येते.
हे वाचा : राज्यात कोरोनाचं थैमान सुरूच! मुंबईत 24 तासांत 40 मृत्यू
सर्व माहिती दिल्यानंतर ग्राहकांना ई टोकन मिळते. या टोकनचा वापर करून ग्राहकाला दारु खरेदी करता येते. टोकननुसार दिलेल्या वेळेत दुकानात जाऊन रांग आणि गर्दीशिवाय ग्राहकांना दारु मिळते.
हे वाचा : चिमुकल्याचं मोठं दातृत्व, कपकेक विकून कमावलेले 50 हजार दिले मुंबई पोलिसांना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus