JOIN US
मराठी बातम्या / देश / नुसता राडा! 52 हजाराच्या दारूचं बिल सोशल मीडियावर व्हायरल, सत्य वाचून धक्काच बसेल

नुसता राडा! 52 हजाराच्या दारूचं बिल सोशल मीडियावर व्हायरल, सत्य वाचून धक्काच बसेल

एवढ्या रुपयांची दारू विकत घेतल्याचं हे हिल व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर इतकी दारू विकत घेणारी ही व्यक्ती कोण आहे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बंगळुरू, 06 मे : देशात दारूची विक्रीसाठी परवाणगी मिळाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. अशात एका दारू खरेदी केल्याच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 52 हजार 841 रुपयांचं दारू खरेदी केल्याचं हे बिल आहे. एवढ्या रुपयांची दारू विकत घेतल्याचं हे हिल व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाल्यानंतर इतकी दारू विकत घेणारी ही व्यक्ती कोण आहे हा चर्चेचा विषय ठरला आहे. सखोल तपासानंतर याचा खुलासा झाला आहे. काही लोकांनी एकत्रितपणे दारू विकत घेतली आणि त्याचा अभिमान व्यक्त करत हे बिल स्वतःच सोशल मीडियावर व्हायरल केलं. याप्रकरणी बेंगळुरू उत्पादन शुल्क विभागानं दुकानदारावर अधिक मद्य विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि खरेदीदारांचा शोध सुरू केला आहे. लॉकडाऊन दरम्यान 4 मे रोजी दारूची दुकानं उघडली असता दारू पिणाऱ्यांची गर्दी झाली होती. बर्‍याच राज्यांत तळीराम दारूच्या दुकानांवर तुटून पडलेले पाहायला मिळाले. तरीही हे ठीक होतं, परंतु या व्यक्तीनं त्याच वेळी इतकी दारू खरेदी केली की त्याचं बिल थेट 52 हजार 841 रुपये झालं. आपलं रक्षण करणाऱ्या पोलिसाला 6 तरुणांनी केली बेदम मारहाण, घटना CCTVमध्ये कैद सोमवारी दारूची दुकानं उघडताच या लोकांनी 52,841 रुपयांची दारू खरेदी केली. 48.5 लिटर दारूचं हे बिल सोशल मीडियावर पोस्ट केलं. व्हॉट्सअ‍ॅपवर हे बिल तुफान व्हायरल झालं. हे व्हायरल झाल्यानंतर अबकारी अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी दुकान मालक एस. बेंकटेश यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, दारू आठ जणांच्या एका ग्रुपने विकत घेतली आहे, परंतु एका कार्डद्वारे त्यांनी पेमेंट केलं. बेंगळूरु दक्षिणच्या अबकारी डीसी सदी एक गिरी यांनी सांगितलं की, आम्ही मालकाने सांगितल्या प्रमाणे चौकशी करत आहोत. दुकान मालक एस. बेंकटेश याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या मित्राच्या कारमध्ये होता महिला पोलीसाचा मृतदेह, धक्कादायक सत्य समोर आहे दारू विक्रीचा नियम 52 हजारांची दारू निकत घेणाऱ्या ग्राहकाचा शोध घेतला जात आहे. नियम असा आहे की, एखादी व्यक्ती किरकोळ दारू दुकानातून 2.6 लिटरपेक्षा जास्त भारत निर्मित विदेशी दारू (IMFL) किंवा 18लिटरपेक्षा जास्त बिअर विकू शकत नाही. दुकानदाराने 13.5 लीटर दारू आणि 35 लीटर बिअर ग्राहकांना विकली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या