JOIN US
मराठी बातम्या / देश / अध्यक्ष ट्रम्प यांच्या तोडीचं PM मोदींसाठी विमान, वैशिष्ट्ये जाणून व्हाल थक्क!

अध्यक्ष ट्रम्प यांच्या तोडीचं PM मोदींसाठी विमान, वैशिष्ट्ये जाणून व्हाल थक्क!

Prime Minister Narendra Modi: जगात सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांच्या तोडीचं विमान आता भारताच्या पंतप्रधानांना मिळणार आहे.

जाहिरात

Brazil: Prime Minister Narendra Modi emplanes for New Delhi from Brazil, Thursday, Nov. 14, 2019. (PIB/PTI Photo)(PTI11_15_2019_000216B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 21 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यासह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या विदेश प्रवासासाठी एक अत्याधुनिक विमान तयार झालं आहे. ‘Air India One’ असं या विमानाचं नाव असल्याची माहिती सांगितली जात आहे. अमेरिकेत हे विमान तयार झालं असून लवकरच ते भारतात येणार आहे. हे विमान आणण्यासाठी Air India, Indian Air Force आणि सुरक्षा संस्थांचे अधिकारी अमेरिकेला रवाना झाल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. VVIPच्या विदेश प्रवासासाठी खास या विमानाची निर्मिती करण्यात आली शत्रूच्या क्षेपणास्त्रांना चकवा देण्याची आणि परतवून लावण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांच्या तोडीचं विमान आता भारताच्या पंतप्रधानांना मिळणार आहे. Boeing-777 या प्रकारातली दोन विमाने भारताने घेतली आहे. या विमानाच्या सर्व चाचण्या अमेरिकेत झाल्या आहेत. आता भारतीय अधिकारी त्याची तपासणी करतील आणि ते विमान भारतात आणलं जाणार आहे. सध्या पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी जे विमान वापरलं जातं ते जुनं झालं आहे. यातलं पहिलं विमान ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भारतात येणार असून दुसरं विमान या वर्षाच्या शेवटी भारताला मिळणार आहे. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष वापरतात त्या Air Force Oneच्या धर्तीवरच भारतासाठीही बोइंगने हे विमान तयार करून दिलं आहे. या विमानाची बांधणी आणि अंतर्गत सजावट खास आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली या विमानाची अंतर्गत रचना करण्यात आली आहे. भारताला मोठा धक्का! कोरोनाविरोधात आशादायी प्लाझ्मा थेरेपीचा वापर यूएसने थांबवला आकाशातून व्हिडीओ आणि ऑडिओच्या माध्यमातून पंतप्रधान कुठेही संवाद साधू शकतात अशी सोय या विमानात आहे. पंतप्रधानांसाठी कार्यालय, बैठकांसाठी खोली, इतर अधिकाऱ्यांसाठी मोकळी जाग आणि राहण्याची स्वतंत्र सोय यात आहे. या विमानात खास सुरक्षा यंत्रणा बसविण्यात आली असून सर्व हल्ल्यांपासून विमानाचं संरक्षण करण्याची व्यवस्था त्यात आहे. क्षेपणास्त्रांच्या माऱ्याला चकवा देण्याची क्षमताही या विमानात आहे. पॉवर स्टेशनला लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू, संख्या वाढण्याची भीती या विमानात एक मेडिकल कक्ष असून त्यात सर्व सोयी करण्यात आल्या आहेत. हे विमान सतत 17 तास प्रवास करू शकतं. भारतीय हवाई दलाचे पायलट्स हे विमान चालविणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या