वॉशिंग्टन, 21 ऑगस्ट : कोरोनाविरोधात लस येईपर्यंत प्लाझ्मा थेरेपी (plasma therapy) कोरोना रुग्णांसाठी आशेचा किरण आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा थेरेपीचं ट्रायल केलं जातं आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत सर्वात जास्त प्रमाणात प्लाझ्मा थेरेपी वापरली जाते आहे. मात्र भारताला ज्या प्लाझ्मा थेरेपीकडून आशा आहे, त्या प्लाझ्मा थेरेपीचा कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापर करणं अमेरिकेनं थांबवलं आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपीला मंजुरी दिली होती. मात्र आता कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा वापर करणं थांबवण्यात आलं आहे. अमेरिकेतील आकडेवारीनुसार प्लाझ्मा थेरेपीची कोरोना रुग्णांवर फारसा परिणाम दिसून येत नाही आहे. इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी फायदेशीर ठरू शकते अशा निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सध्या उपलब्ध असलेला अहवाल पुरेसा नसल्याचं वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे वाचा - कधी मिळणार मेड इन इंडिया कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली गूड न्यूज दरम्यान भारतात मोठ्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपी मोठ्या प्रमाणात वापरली जाते आहे. दिल्ली, महाराष्ट्र, हरयाणा अशा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरेपी वापरण्यास सुरू केलं आहे. शिवाय अनेक प्लाझ्मा बँकही उभारण्यात आल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीची सुरक्षितता आणि परिणामकात तपासण्याासठी एप्रिलमध्ये ट्रायल सुरू केलं मात्र त्याचा अहवाल अद्याप जारी करण्यात आलेला नाही. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल इथिक्सचे अमर जेसानी म्हणाले, प्लाझ्मा थेरेपी प्रभावी आहे क्लिनिकल ट्रायलच्या अहवालातूनच समजू शकतं. भारतात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरेपीचं क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यात आलं. आता ऑगस्ट सुरू झाल आहे. मात्र अजूनही त्याचा अहवाल आला नाही. हे वाचा - दिलासादायक बातमी! 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची कोरोनावर मात, वाचा आजची आकडेवारी आयसीएमआरने प्लाझ्मा थेरेपीचा अहवाल जारी केला नसला तरी नवी दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने (AIIMS) केलेल्या प्लाझ्मा थेरेपीच्या ट्रायलबाबत माहिती दिली होती. ट्रायलच्या प्राथमिक पडताळणीनुसार प्लाझ्मा थेरेपी कोरोना रुग्णांवर सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे, त्याचा रुग्णांवर काही दुष्परिणाम होत नाही आहे. मात्र त्याचवेळी त्याचा काही फायदाही होताना दिसत नसल्याचं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.