JOIN US
मराठी बातम्या / देश / एकेकाळी या साखर कारखान्याने उजळून निघायचे शहर; मात्र, आज त्याचेच अस्तित्व अंधारात, वाचा सविस्तर...

एकेकाळी या साखर कारखान्याने उजळून निघायचे शहर; मात्र, आज त्याचेच अस्तित्व अंधारात, वाचा सविस्तर...

या मिलमध्ये एका शिफ्टमध्ये सुमारे 1500 कामगार काम करायचे.

जाहिरात

लक्ष्मी शुगर मिल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शिवहरि दीक्षित, प्रतिनिधी हरदोई, 3 जून : उत्तरप्रदेशच्या हरदोई येथे लक्ष्मी शुगर मिलची साखर प्रसिद्ध होती. तसेच येथून संपूर्ण शहर उजळून निघेल अशी व्यवस्था होती. एकेकाळी संपूर्ण शहराला वीज पुरवण्याची जबाबदारी या गिरणीवर होती. मात्र, आज ती स्वतः अंधारात आहे. हरदोईच्या लक्ष्मी शुगर मिलची साखर संपूर्ण आशियामध्ये प्रसिद्ध होती आणि म्हणूनच तिला आशियातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला होता. ही गिरणी ब्रिटिश काळात 1935 मध्ये सुरू झाली. परंतु ही मिल 1999 साली तोट्यात आली आणि बंद पडली.

या मिलची साखर एकेकाळी आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर होती. या कारखान्याच्या साखरेला देश-विदेशात मोठी मागणी होती. तसेच हरदोई शहराला हरदोईच्या या लक्ष्मी साखर कारखान्यातून वीजपुरवठा केला जात होता. त्यामुळे संपूर्ण शहर उजळून निघत होते. पण ज्या गिरणीतून संपूर्ण शहर उजळून निघाले होते, आज ती स्वतःच अंधारात आहे. या मिलमध्ये तीन टर्बाइन होत्या. त्यामुळे निर्माण होणारी वीज गिरणी चालवून शहराला वीजपुरवठा करण्यासाठी वापरली जात होती. या मिलचे माजी कर्मचारी मनोज कुमार सांगतात की, या मिलमध्ये एका शिफ्टमध्ये सुमारे 1500 कामगार काम करायचे, जे मिल बंद झाल्यानंतर बेरोजगार झाले. तर श्रीधर शुक्ल सांगतात की, ही मिल 1975 पर्यंत चांगली चालली. मात्र, ती सरकारच्या अखत्यारीत येताच, तेव्हापासून सर्वच अधिकाऱ्यांकडून तिला लुटण्यात आले. काहींनी तिची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला पण ते त्यात अयशस्वी झाले आणि शेवटी 1999 मध्ये ती बंद पडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या