अहमदाबाद, 17 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत असल्याने लॉकडाऊनची मर्यादाही वाढविण्यात आली आहे. यादरम्यान विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या श्रमिक ट्रेनच्या मदतीने मजुरांना आपल्या गावी जाता येत आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये रविवारी प्रवासी मजुरांनी दगडफेक केल्याची बाब समोर आली आहे. राजकोटमधील शापर औद्योगिक भागातून बिहार आणि उत्तर प्रदेशात जाणारी दोन श्रमिक ट्रेन रद्द झाली. यानंतर चिडलेल्या मजुरांनी वाहनांची तोडफोन केली. राजकोट ग्रामीणचे एसपी बलराम मीणा यावर म्हणाले की, या घटनेत जे लोक सहभागी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यापूर्वी शनिवारी गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील एका कोविड – 19 प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि काही वाहनांची तोडफोड केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री तब्बल 68 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांवर लाठीहल्ला केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. भक्तिनगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की लोकांना पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक कली आणि वाहनांची तोडफोड केली. जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रेड झोनमधील बॅरिकेट्स हटविण्यास रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा मजुरांनी गोंधळ घातला आणि वाहनांची तोडफोड केली. संबंधित - गरीब विक्रेत्याकडून खरेदी केले सर्व चपलांचे जोड; अनवाणी चालणाऱ्या मजुरांना दिले मुंबईवरून आलेल्या महिलेला कोरोनाची लागण, परभणीतील रुग्णांची संख्या वाढली