JOIN US
मराठी बातम्या / देश / 77 लाखांचा खर्च, 25 टन लोखंड; भर चौकात का उभारलं हे जहाज?

77 लाखांचा खर्च, 25 टन लोखंड; भर चौकात का उभारलं हे जहाज?

77 लाखांचा खर्च करून आणि 25 टन लोखंडं वापरून चौकाच्या मध्यावर जहाज बसवण्यात आलं आहे.

जाहिरात

चौकाच्या मधोमध बसवलं जहाज

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

शक्ति सिंह, प्रतिनिधी कोटा, 31 मे - शैक्षणिक शहर अशी ओळख असलेल्या राजस्थानच्या कोटामध्ये गेल्या काही वर्षांत पर्यटनाच्यादृष्टीने अनेक बदल घडवण्यात आले आहेत. सध्या तर सगळीकडे कोटाच्या विशाल सागरी जहाजाचीच चर्चा आहे. कुनहाडी परिसरातील एका चौकात मेरठच्या कारागिरांनी 5 महिन्यांमध्ये हे जहाज बांधलं, या जहाजासारखे आकर्षक जहाज भारतात इतर कुठेही आढळणार नाही. 77 लाख 50 हजार रुपयांचा अवाढव्य खर्च करून तब्बल 25 टन लोखंडाने हे शोभेचे भव्य जहाज उभारण्यात आलं आहे. या जहाजाची लांबी 21 मीटर, रुंदी 5.15 मीटर आणि उंची 6.5 मीटर इतकी आहे. या जहाजाला खराखुरा लूक देण्यासाठी त्याच्या आजूबाजूला तलाव तयार करून त्यात पाणी भरण्यात आलं आहे. पाण्याच्या आत निळा प्रकाश बसवल्याने ते अधिकच आकर्षक दिसते. आता या पाण्यात लाटा दिसाव्या आणि जहाजात उभ्या असलेल्या व्यक्तीला ते पुढे सरकतंय असं वाटावं यासाठी तलावात पंप बसवण्यात येणार आहेत, त्यानंतर जहाज अधिकच सुंदर दिसेल. दरम्यान, कोटामध्ये बांधलं जाणारं जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या चंबळ रिव्हर फ्रंटचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. ज्यामध्ये एकामागून एक भव्य कलाकृती निर्माण झाल्या आहेत. चंबळ रिव्हर फ्रंटजवळील चौकाचौकात हे विशाल सागरी जहाज बसवण्यात आले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या