जोडप्याने हॉस्पिटलमध्येच केलं लग्न
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी: हिंदू धर्मात विवाह हा एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. काही विवाहसोहळे एखाद्या खास घटनेमुळे लोकांच्या कायम लक्षात राहतात. खरं तर अलीकडच्या काळात विवाह सोहळ्यादरम्यान एखादा अपघात घडणं, विविध कारणांमुळे वाद-विवाद होणं आदी प्रकार घडल्याचं आपण पाहतो, ऐकतो. सोशल मीडियावर अशा घटनांचे व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. सध्या राजस्थानमधील एक विवाह सोहळा खास कारणामुळे चर्चेत आहे. विवाह सोहळ्यादरम्यान विधी सुरू असताना वधू पायऱ्यांवरून घसरून पडली. या अपघातात तिचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले तसंच तिच्या डोक्यालाही दुखापत झाली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण विवाहासाठी वर रुग्णालयात वरात घेऊन गेला आणि तिथं त्यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे. राजस्थानमधील एक विवाह सोहळा सध्या चर्चेत आहे. अपघातामुळे एसबीएस रुग्णालयात असलेल्या एका महिलेशी विवाह करण्यासाठी वर थेट तिथं वरात घेऊन गेला आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह झाला. या साठी रुग्णालयातील एक रुम बुक करण्यात आली होती. विवाह सोहळ्यासाठी ही रुम सजवण्यात आली होती. कोटा जिल्ह्यातील रामगंज मंडी परिसरातील भावपुरा येथील रहिवासी पंकजचा विवाह शनिवारी रावतभाटा येथील मधु राठोड हिच्याशी होणार होता. गेल्या आठवड्यापासून विवाहाची तयारी आणि पारंपारिक विधी या दोघांच्या घरी सुरू होती. शनिवारी पंकजची वरात निघाली. रविवारी विवाह सोहळा पार पडणार होता. या दरम्यान वधु पायऱ्यांवरून घसरून पडली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. पण अशा स्थितीतही विवाह पुढे न ढकलण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबांनी घेतला.
Success Story : 25 मिनिटे चालली मुलाखत, IAS कृति राज यांच्या या उत्तरावर बोर्ड मेंबरही हसलेकोटा येथील रहिवासी आणि पंकजचे मेव्हणे राकेश राठोड यांनी सांगितलं, ``या दुर्घटनेनंतर दोन्ही कुटुंबियांनी मधु आणि राकेशचा विवाह रुग्णालयातच करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी एक रुम बुक केली आणि ती रुम सजवण्यात आली. या ठिकाणी लग्नाचे विधी पार पडले. व्हिलचेअरवर बसलेल्या वधूने आणि वराने एकमेकांना पुष्पहार घातला आणि सोहळा पार पडला. ``
एक गाव असंही! जिथे चालतो त्यांचा स्वतःचा कायदा, पाहा कुठे आहे हे?दरम्यान, या अपघातात मधु राठोडचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आहेत. तसेच डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने कोटा येथे आणले. कोटामधील एसबीएस रुग्णालयात वधूला दाखल करण्यात आलं. त्यानंतर पंकजचे वडील शिवलाल राठोड आणि मधुचे वडील रमेश राठोड यांनी चर्चा करत विवाहाचे विधी रुग्णालयात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा सोहळा रुग्णालयातील एका रुममध्ये पार पडला. या सोहळ्यादरम्यान पंकजने मधुला मंगळसूत्र घालून भांगात सिंदूर लावला. मधूला अजूनही चालता येत नसल्याने सप्तपदीचा विधी होऊ शकला नाही. तिला अजून काही दिवस रुग्णालयातच राहावं लागणार आहे. त्यामुळे आता वराचे आणि तिचे कुटुंबीय तिची देखभाल करणार आहेत.