JOIN US
मराठी बातम्या / देश / Escape from Sudan : गोळीबार अन् 900 किमी दूर जीव धोक्यात घालून बंगालचा हा अभियंता घरी कसा परतला??

Escape from Sudan : गोळीबार अन् 900 किमी दूर जीव धोक्यात घालून बंगालचा हा अभियंता घरी कसा परतला??

जीव वाचविण्यासाठी लोक जमा झाले आणि काही सुरक्षित ठिकाणी थांबले होते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रुद्रनारायण राॅय, प्रतिनिधी कोलकाता, 20 मे : गेल्या सहा आठवड्यांपासून सुदानमध्ये युद्धसदृश परिस्थिती आहे. असे असताना भारतीयांनी सुदान देश सोडल्याच्या बातम्या येत आहेत. त्यातच सुमारे दोन आठवड्यांपूर्वी सुदानमधून सर्व भारतीयांची सुटका करण्यात आल्याचा दावा करून भारताने ऑपरेशन कावेरीची सांगता केली. पण आता एक भयानक स्वप्नासारखी गोष्ट समोर येत आहे, जी सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत कसे आणता येईल हे सांगते. बंगालच्या या तरुणाने घटना अशा प्रकारे कथन केली की सुदानच्या संकटाचे चित्र स्पष्ट झाले. सर्वत्र घबराट पसरली होती. सर्वत्र हिंसाचार आणि हल्ले सुरु होते. जीव वाचविण्यासाठी लोक जमा झाले आणि काही सुरक्षित ठिकाणी थांबले होते. आम्ही खार्तूममधील एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला. माझ्यासोबत इतर 49 भारतीय होते. आम्ही सातत्याने भारतीय दूतावासाची मदत घेत होतो. खार्तूममधील त्या हॉटेलपर्यंत मदत पोहोचेल असे वाटत नव्हते, त्यामुळे आम्हाला तिथून 900 किमी दूर असलेल्या पोर्ट सुदानला पोहोचायचे होते.

‘जेव्हा हॉटेलमधला खाण्यापिण्याचा साठा संपण्याच्या मार्गावर आला, तेव्हा तिथे थांबण्यात अर्थ नव्हता. आम्हाला पोर्ट सुदान गाठायचे होते. मग आम्हाला धोका पत्करावा लागला. आम्ही बस भाड्याने घेतली आणि त्यासाठी 10 लाख रुपये दिले. प्रत्येक व्यक्तीवर सुमारे 30 हजार रुपये खर्च झाले. प्रत्येकाने आपला जीव धोक्यात घालून पोर्ट सुदान गाठले. ‘आमच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. आम्ही कसे तरी सर्व हल्ल्यांपासून वाचण्यात यशस्वी झालो आणि नंतर आम्हाला ऑपरेशन कावेरी अंतर्गत एक भारतीय विमान मिळाले, जे आम्हाला सौदी अरेबियातील जेद्दाह आणि तेथून दिल्लीला घेऊन गेले. अनेक आठवडे कुटुंबाशी संपर्क होऊ शकला नाही - व्यवसायाने सॉफ्टवेअर अभियंता आणि बंगालचा रहिवासी असलेल्या सुरजित डे यांनी हा अनुभव कथन केला. ते त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांनीच मार्च 2023 मध्ये सुदानला गेला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, सुदानमध्ये लष्कर आणि जलद सुरक्षा दलामध्ये युद्ध सुरू होताच, आम्ही आमच्या नातेवाईकांशी संपर्क साधू शकलो नाही. या सर्वांनी भारताच्या ऑपरेशन कावेरीचे आभार मानले. विशेष म्हणजे सुदानमध्ये सुरू असलेल्या लष्करी संघर्षामुळे आतापर्यंत 400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. भारताने आपल्या सुमारे 3500 नागरिकांची सुटका केली असून UN च्या अहवालानुसार आतापर्यंत सुमारे 10 लाख लोक तिथून विस्थापित झाले आहेत. आताही सुदानमध्ये परिस्थिती बिकट झाली असून हवाई हल्ले आणि बॉम्बस्फोट होत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या