नवी दिल्ली : कर्नाटकातील निवडणुकीच्या निकालाने काँग्रेस भलेही गोंधळलेली दिसत असली तरी आता त्यांच्यासमोर मुख्यमंत्रिपदी कोणाची निवड करायची हे मोठं आव्हान आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर सस्पेन्स कायम असून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोघांची नाव सध्या चर्चात आहेत. कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा पेच काही केल्या सुटेना अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे सतत दिल्ली फेऱ्या चालू आहेत. ‘कर्नाटकला असे नेतृत्व मिळायला हवं जे चांगले प्रशासन देऊ शकेल. मुख्यमंत्रीपदावर असा नेता असावा, ज्यावर जनतेचा विश्वास असेल असा नेता मुख्यमंत्रीपदी असावा असं कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणारे प्रदेश पक्षाचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले आहेत.
कर्नाटक निकालानंतर भाजप सावध; लोकसभेसाठी आखला मास्टर प्लान, बावनकुळे म्हणाले..मुख्यमंत्रीपदासाठी आपले नाव की अन्य कोणाचे नाव या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. ‘मुख्यमंत्री बनवण्याबाबत कोणालाच माहिती नाही, कर्नाटकला बदल हवा होता. आम्ही त्या परिवर्तनाचा भाग होतो. पुढील मुख्यमंत्री होणार? असं जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा सिद्धरामय्यांचं नाव माध्यमांमधून समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.
कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात चुरस आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डीके शिवकुमार सोमवारी दिल्लीला येणार होते, पण आजारपणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांच्या जागी त्यांचे भाऊ डीके सुरेश यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.
ना सिद्धरामय्या, ना शिवकुमार; काँग्रेस आमदारांनी यांना दिले मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकारकर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाबाबतच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेस नेते सिद्धरामय्या काल दिल्लीत भेट देऊन आले. या चर्चेच्या फेऱ्यांनंतर आता मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.