JOIN US
मराठी बातम्या / देश / पाकिस्तानचा सर्वात मोठा कट उधळला, 100 कोटींचे ड्राग्स आणि मोठी रक्कम जप्त

पाकिस्तानचा सर्वात मोठा कट उधळला, 100 कोटींचे ड्राग्स आणि मोठी रक्कम जप्त

अटक केलेले तीनही दहशतवादी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिंदवाडा, 11 जून : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कुरापती एकीकडे सुरू असतानाच लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला होता. हिंदवाडा पोलिसांनी कारवाई करत 3 जणांच्या मुस्क्या आवळल्या आहेत. लष्कर ए तोएबाच्या तीन दहशतवाद्यांकडून लाखो रुपये, ड्रग्स आणि काही साहित्यही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. अटक केलेले तीनही दहशतवादी पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. 21 किलो हेरोइन ज्याची बाजारातील सध्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. त्यासोबतच पैसे आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केलं आहे. लष्कर ए तोएबाच्या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी ड्राग्स पुरवण्याचं काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार ड्राग्स विकून येणाऱ्या पैशांमधून दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याची माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेले तीनही जण हे पाकिस्तानमधील दहशतवादी हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. हे तिघे लष्कर ए तोएबासाठी काम करत असल्याचं हिंदवाडाच्या एसपींनी माहिती दिली आहे. हे वाचा- EDचा दणका, नीरव मोदी आणि चोकसीचा 1,350 कोटींचा खजिना हाँगकाँगहून आणला भारतात हे वाचा- अमेरिकेची ही रायफल शत्रूचा उडवेल थरकाप, लक्ष्य भेदण्याची खात्री झाल्यावरच गोळी संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या