JOIN US
मराठी बातम्या / देश / INS VIKRANT : मोठी बातमी! आयएनएस विक्रांतवर 19 वर्षीय खलाशाने घेतला गळफास? नौदलात खळबळ

INS VIKRANT : मोठी बातमी! आयएनएस विक्रांतवर 19 वर्षीय खलाशाने घेतला गळफास? नौदलात खळबळ

INS VIKRANT : आयएनएस विक्रांतवर 19 वर्षीय खलाशाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत लटकलेल्या स्थितीत आढळला आहे.

जाहिरात

संग्रहित छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विवेक गुप्ता, प्रतिनिधी कोची, 27 जुलै : आयएनएस विक्रांत युद्धनौकेत नौदलाच्या खलाशाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर 19 वर्षीय नौदलाच्या खलाशाने गळफास लावून आपलं जीवन संपवल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर नौदलात खळबळ उडाली आहे. आयएनएस विक्रांत कोची येथे असताना ही घटना घडली. या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, या प्रकरणी नौदलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अविवाहित खलाशी बिहारमधील मुझफ्फरपूर येथील रहिवासी होता. स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित बातम्या

अधिका-यांनी सांगितले की, युद्धनौकेच्या एका भागात खलाशाचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश नौदलाला देण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी खलाशी आयएनएस विक्रांतवर लटकलेल्या अवस्थेत आढळला. विमानवाहू युद्धनौका सध्या कोची येथे उभी आहे. वाचा - ज्योती, सीमा, अंजूनंतर आता जूही; बांग्लादेशातील तरुणीसोबत फेसबुकवर प्रेम, पुढे काय घडलं? INS विक्रांत ही भारतातील पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आहे. 45,000 टन वजनाचे विक्रांत नावाचे जहाज केरळमधील कोचीन शिपयार्ड येथे 20,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं आहे. एवढ्या आकाराची विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता फक्त अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स आणि चीनकडे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या