ब्रिटन आणि अमेरिकेत केलेल्या संशोधनात डॉक्टरांना लक्षणांची 6 क्लस्टर्स सापडली आहेत. त्यात कोरोनाची सर्व लक्षणे आढळून येत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
मुंबई 18 मे: देशात आजपासून चौथ्या लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुढचे दोन महिने भारतासाठी अतिशय महत्त्वाचे असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संभाव्य आकडे लक्षात घेऊन सरकारनेही तयारी सुरू केली आहे. जुलैपर्यंत तब्बल १ कोटी लोकांच्या टेस्ट करण्याचं टार्गेट आखण्यात आलं आहे. देशात कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याच प्रमाणात सरकारने तयारी सुरू केली आहे. आत्तापर्यंतचा ग्राफ लक्षात घेता काही मॉडेल्सवर तज्ज्ञ काम करत आहेत. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात ५ ते ७ लाख नवे रुग्ण येऊ शकतात. तर ऑगस्टमध्ये हाच आकडा १० लाखांपर्यंत जाऊ शकतो. ही वाढ लक्षात घेता सरकारने तयारी सुरू केली आहे. एवढ्या बेड्सची उपलब्धता, त्यांच्यासाठी लागणारी उपकरणं, मनुष्यबळ, त्यासाठी लागणारं प्रशिक्षण अशा सर्व गोष्टींची तयारी करण्याच्या सूचना राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत. गावी आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी असं केलं क्वारंटाइन की, कुणालाही येईल राग! देशात २० मोठ्या शहरांची निवड करण्यात आली असून त्यांच्यावर फोकस करण्यात येणार आहे. त्या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, भोपाळ, इंदूर आणि चेन्नईचा समावेश आहे. रुग्णांचं ट्रेसिंग करण्यासाठी टेस्टची संख्या वाढविण्यात येणार आहे. मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात टेस्ट करण्यात येणार आहेत अशी माहिती दिली जात आहे. कोरोनाला हरवणं शक्य! ‘ही’ औषधं वापरून 4 दिवसांत डॉक्टरांनी बरे केले 60 रुग्ण
देशात सध्या ९१ लाख कोरोनाबाधित रुग्ण असून दररोज नव्याने ४ ते ५ हजार रुग्णांची वाढ होत आहे. देशात होणाऱ्या टेस्टमध्ये 4.3 टक्के लोक पॉझिटिव्ह निघत आहेत. पण महाराष्ट्रात हा आकडा 11.9टक्के एवढा आहे. म्हणजेच प्रत्येक १०० टेस्ट केल्यानंतर राज्यात १२ लोक पॉझिटिव्ह निघत आहेत. दिल्लीत हे प्रमाण 9% ,गुजरात (7.8%) छत्तीसगढ़(6%), तेलंगना (5.4%), मध्य प्रदेश (4.9%) आणि पश्चिम बंगाल(4.6%) आहे. हे आकडे 15 मई पर्यंतचे आहेत.