Chennai: Chief of the Army Staff General Bipin Rawat addresses during the inauguration of Young Leaders Training Wing (YTW) at Officers Training Academy, in Chennai, Monday, Sept. 23, 2019. (PTI Photo)(PTI9_23_2019_000095B)
नवी दिल्ली 21 ऑक्टोंबर : पाकिस्तान गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असल्याने भारताने त्याला आज जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या कारवाईत 6 ते 10 अतिरेकी ठार झाले आणि तीन दहशतवादी कॅम्प्स् नष्ट झाले अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आज दिली. पाकिस्तान अजुन शहाणं झालेलं दिसत नाही. वारंवार सांगूनही पाकिस्तानने आपल्या उचापती सुरूच ठेवल्या आहेत. दहशतवाद्यांना पाठवणं असच सुरू राहिलं तर पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ आणि दहशतवादी कारवाया ठेचून काढू असा इशाराही रावत यांनी दिला. नियंत्रण रेषा ओलांडून काही अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत होते अशी विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतरच भारताने ही कारवाई केली असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात 1 हजार उमेदवार कोट्यधीश तर 916 उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल दहशतवाद्यांसोबत लढताना महाराष्ट्राचे सुपुत्र जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज यांना वीरमरण आले आहे. वाळुंज हे चांदवड तालुक्यातील भरवीर येथील रहिवासी होते. सोमवारी (21 ऑक्टोबर) त्यांचं पार्थिव मुंबईमध्ये आणलं जाणार आहे. मंगळवारी (22 ऑक्टोबर) मूळगाव भरवीर येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे चांदवड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. रविवारी (20 ऑक्टोबर) देखील जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये आपल्या देशाच्या दोन जवानांना वीरमरण आलं. तसंच एक सामान्य नागरिकही मृत्युमुखी पडला. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला आपल्या शूर जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्यानं कुपवाड्यातील तंगधार सेक्टरमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास सीमेपलीकडून घुसखोर पाठवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस शस्त्रसंधीचं उल्लंघन देखील केलं. या गोळीबारात परिसरातील दोन घरांचं नुकसान झालं. दरम्यान, या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. जय हिंद! भारतीय जवानांनी आर्टिलरी गनने 35 दहशतवाद्यांचा काढला काटा आज सकाळी सीमेवर पाकिस्तानच्या कुरापतींना भारताच्या लष्करानं सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या 35 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी (19 ऑक्टोबर) रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते. त्याचा बदला घेत भारताच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच पाकिस्तानचे 6-10 सैनिक ठार झाले असून 25 पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आहेत. तर 35 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. भारताने याआधीही सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता ही मोठी कारवाई केली आहे.