महाराष्ट्राचा महासंग्राम 2019 : 1 हजार उमेदवार कोट्यधीश तर 916 उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल

महाराष्ट्राचा महासंग्राम 2019 : 1 हजार उमेदवार कोट्यधीश तर 916  उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल

2014 च्या विधानसभा निवडणुकींपेक्षा 2019मध्ये कोट्यधीश उमेदवारांची संख्या घटली आहे.

  • Share this:

मुंबई 21 ऑक्टोंबर : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आणि प्रचार यावेळी चांगलाच गाजला. आरोप-प्रत्यारोप, हल्लाबोल आणि प्रचार सभांमुळे वातावरण ढवळून निघाले. या प्रचारात सर्वच पक्षांनी जे उमेदवार दिलेत त्या उमेदवारांची संपत्ती आणि त्यांची पार्श्वभूमी चकीच करणारी आहे. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना जे शपथपत्र दिलं त्या शपथपत्रांचा अभ्यास करून Association for Democratic Reforms (ADR) या संस्थेने काही निष्कर्ष काढले आहेत. त्यावरून सर्व उमेदवारांमधले 1 हजार उमेदवार कोट्यधीश असून तब्बल 916 उमेदवारांविरुद्ध गुन्हेगारी स्वरुपांचे खटले दाखल असल्याची माहिती पुढे आलीय. या श्रीमंत उमेदवारांमध्ये सर्वात जास्त उमेदवार हे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेचे असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीही फार मागे नाहीत. एकूण 1,007 उमेदवार हे कोट्यधीश आहेत अशी माहिती ADR ने दिलीय. यासाठी विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीतल्या 3,112  उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आलाय. त्यातले 1,007 उमेदवार हे कोट्यधीश असल्याचं आढळून आलंय. 2014 मध्ये 2,336 उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास करण्यात आलाय. त्यातले 1,095 उमेदवार हे कोट्यधीश असल्याचं आढळून आलं होतं.

पंकजा तब्बल 20 तासांनंतर जनतेसमोर आल्या अन् प्रतिक्रिया न देताच निघून गेल्या

भाजपच्या 162 उमेदवारांपैकी 155 (96 टक्के) तर शिवसेनेच्या 124 पैकी 116 (94 टक्के) उमेदवार हे कोट्यधीश आहेत. काँग्रेसच्या 147 पैकी  126 (86 टक्के ) तर राष्ट्रवादीच्या 116 पैकी 101 (87 टक्के)  उमेदवार हे कोट्यधीश आहेत. 3,112 उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केल्यानंतर असं आढळून आलंय की त्यातल्या 916 म्हणजे 29 टक्के उमेदवारांनी त्यांच्यावरच्या गुन्हेगारी स्वरुपांच्या प्रकरणांची माहिती दिलीय. 2014 मध्ये 2,336 उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केल्यानंतर असं आढळून आलंय की त्यातल्या 798 उमेदवारांनी म्हणजे 34 टक्के जणांनी त्यांच्यावरच्या खटल्यांची माहिती दिलीय.

VIDEO : 'बहीण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न', धनंजय मुंडे झाले भावुक

या सर्व उमेदवारांमध्ये भाजपचे घाटकोपरचे उमेदवार पराग शहा हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची संपत्ती ही 500 कोटी एवढी आहे. तर दुसरे श्रीमंत उमेदवार मंगलप्रभात लोढाहेही भाजपचेच असून त्यांची संपत्ती 440 कोटी एवढी आहे. संजय जगताप हे काँग्रेसचे उमेदवार तीसरे श्रीमंत उमेदवार असून त्यांची संपत्ती ही 245 एवढी आहे.

महाराष्ट्रातील हा उमेदवार आहे सर्वात श्रीमंत, 3.5 कोटींच्या फेरारी कारमधून फिरतो

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोट्यधीश उमेदवारांची संख्या घटली आहे. 2019 मध्ये 3,112 उमेदवारांच्या शपथपत्राचा अभ्यास करण्यात आला आहे त्यात 1,007 उमेदवार कोट्यधीश आढळले हे प्रमाण 32 टक्के एवढं होतं. तर 2014मध्ये 2,336  उमेदवारांच्या शपथपत्राचा अभ्यास करण्यात आला आहे त्यात 1,095 उमेदवार कोट्यधीश आढळले. हे प्रमाण 47 टक्के एवढं होतं.

First Published: Oct 20, 2019 05:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading