जम्मू, 20 ऑक्टोबर: सीमेवर पाकिस्तानच्या कुरापतींना भारताच्या लष्करानं सडेतोड उत्तर दिलं आहे. प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईत जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या 35 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी रात्री पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले होते. त्याचा बदला घेत भारताच्या लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अनेक तळ उध्वस्त झाले आहेत. तसेच पाकिस्तानचे सहा सैनिक ठार झाले असून 25 पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले आहेत. तर 35 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. भारताने याआधीही सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर आता ही मोठी कारवाई केली आहे.
#UPDATE Sources: Terrorist launch pads in PoK’s Jura, Athmuqam and Kundalsahi were targeted by Indian Army artillery guns last night after credible inputs came of significant number of terrorists operating there. pic.twitter.com/mICB8Z9P4K
— ANI (@ANI) October 20, 2019
भारतीय जवानांनी तंगधार सेक्टरमधून तोफांना मारा केला. भारताच्या या कारवाईत दहशतवाद्यांचे अनेक लाँच पॅड उद्ध्वस्त झाले आहेत. त्याआधी जम्मू-काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून काल (शनिवारी) रात्री झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबाराला भारताने देखील चोख उत्तर दिले.
Sources: As per reports, 4-5 Pakistan Army soldiers have been killed and several have been injured. Indian Army has launched attacks on terrorist camps situated inside Pakistan occupied Kashmir (PoK) opposite the Tangdhar sector. pic.twitter.com/SFFFjAReHX
— ANI (@ANI) October 20, 2019
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकने सीमेपलिकडून गोळीबार करण्याचे प्रमाण वाढवले आहे. पाकिस्तानकडून शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले. या गोळीबारात एक नागरिक देखील ठार झाला असून अन्य तिघे जण जखमी झाले.
Indian Army has launched attacks on terrorist camps situated inside Pakistan occupied Kashmir (PoK) opposite the Tangdhar sector. This is in retaliation to the support provided by Pakistan Army to push terrorists into Indian territory. pic.twitter.com/yCJaBV1NXk
— ANI (@ANI) October 20, 2019
काश्मीर खोऱ्यातील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी करण्यात आला होता.
Indian army has used artillery guns to target the terrorist camps which have been actively trying to push terrorists into Indian territory. https://t.co/MHfOLqbYUr
— ANI (@ANI) October 20, 2019
स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानकडून झालेल्या या गोळीबारामुळे अनेक घरांचे देखील नुकसान झाले आहे. भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिले. याआधी अशाच प्रकारे पाकिस्तानकडून बारामुल्ला येथे झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता.
सप्टेंबरपासून 2 हजारवेळा पाकिस्तानने शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं. यामध्ये अनेक भारतीय जवान शहीद झाले तर सामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागले. गेल्याच आठवड्यात बुधवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. यातील एक जण अनंतनाग जिल्ह्यातीलच होता. नसीर गुजजार छद्रू उर्फ अबु हन्नान असे त्याचे नाव होते. तर जाहिद अहमद लोन आणि आकिब अहमद हजाम अशी अन्य दोघांची नावे आहेत. हे सर्व जण गेल्यावर्षी लष्कर-ए-तोयबामध्ये दाखल झाले होते.
SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!