नवी दिल्ली, 30 जून : पूर्व लडाखमध्ये सात आठवड्यांपासून चीनसोबत सुरू असललेल्या वादामुळे भारतीय नौदलाने आता हिंदी महासागरात आपली गस्त वाढवली आहे. या परिसरात कडी पाळत ठेवण्यात येत आहे. हिंदी महासागरातील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठिकाणी नौदलाने आपली जहाजं तैनात केली आहेत. याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाने अमेरिकन आणि जपानी नौदलांबरोबर संयुक्त लष्करी अभ्यास केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. वाढत्या चिनी उपक्रमांच्या दृष्टीने भारतीय नौदलाला हिंदी महासागराच्या परिसरात अत्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ते या भागातील चीनच्या वाढत्या हालचालींवर सतत नजर ठेवून आहे. हिंदी महासागराच्या रणनीतिक जल क्षेत्रामध्ये सुरक्षा ठेवण्यासाठी भारताने या भागात अमेरिका आणि जपानबरोबर मैत्रीपूर्ण नौदल सरावदेखील केला आहे. कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट भारतीय नौदलाने शनिवारी हिंदी महासागर क्षेत्रात जपानी नौदलाबरोबर एक मोठा सराव केला. चिनी नौदल जहाजं आणि पाणबुडी या भागात गस्त घालतात. त्यामुळे भारतीय नौदल जहाज आय.एन.एस. राणा आणि आय.एन.एस. कुलिश यांनीही या लष्करी सरावामध्ये भाग घेतला होता. मुंबईत येणाऱ्यांसाठी नवा नियम, या आदेशाचं पालन नाही झालं तर होईल कारवाई खरंतर, दोन जपानी युद्धनौका जे.एस. काशिमा आणि जे.एस. शिमायुकी यादेखील यामध्ये सामील झाल्या. या देशांमधील नौदल समन्वय आणि सहकार्य वाढवणं हाच या सरावाचा हेतू होता. भारतीय नौदलाने ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सच्या नेव्हीबरोबरही सहकार्य वाढवलंआहे. पूर्वेकडील लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा चीनचा प्रयत्न आणि दक्षिण चीन समुद्र आणि इंडो-पॅसिफिकमध्ये हस्तक्षेप करण्याच्या दरम्यान या लष्करी सराव खूप महत्त्वपूर्ण आहेत. संपादन - रेणुका धायबर