मुंबई, 29 जून : राज्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढलं. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात (Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali, bhiwandi,) कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात आता विनाकारण मुंबईत कोणालाही प्रवास मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईत विनाकारण येणारे, दुचाकी वर 2 जण प्रवास करणारे या सगळ्यांना बंदी घालण्यात आली आहे. दहिसर हा नवा हॉटस्पॉट तर आहेच पण मुंबईच प्रवेशद्वारही आहे. या प्रवेशद्वारावर दहिसर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईबाबत स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम एम मुजावर यांनी यासंबंधी माहिती दिली. कोरोनाची 3 नवी लक्षणं आली समोर, त्रास जाणवला तर तात्काळ करा COVID-19 टेस्ट अनलॉक (Unlock) नंतर कोरोना रुग्णांच्या (Corona) संख्येत झापाट्याने वाढ होत आहे. आज आत्तापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत निघाले असून 24 तासांमध्ये तब्बल 5493 COVID- 19 रुग्णांची वाढ झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 64 हजार 626वर गेला आहे. तर आज 156 जणांच्या मृत्यची नोंद झाली. त्यामुळे मृत्यूचा आकडा 7429 वर गेला आहे. 60 मृत्यू गेल्या 48 तासातले आहेत तर उर्वरित मृत्यू मागील काही काळातले आहेत. राज्यात मृत्यू दर 4.51 टक्के आहे. मुंबईत रुग्णसंख्येने 28 हजारांचा आकडा पार केला आहे. आज पुन्हा वाढल्या Petrol-Diesel च्या किंमती, वाचा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर दरम्यान कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने मुंबई जवळच्या काही भागात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात लॉकडाउन (Lockdown) शिथिल केल्यानंतर काही भागात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकं वर काढलं आहे. विषाणू संसर्ग बाधीत रुग्णं वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबीवली, उल्हासनगर या महानगर पालिका क्षेत्रात (Thane, Navi Mumbai, Kalyan-Dombivali, bhiwandi,) कोरोना संसर्ग वाढणाऱ्या विभागात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. संकलन आणि संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.