कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 60 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.
नवी दिल्ली, 26 जुलै : भारतातील कोरोना (India coronavirus) रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. 24 तासांत तब्बल 48 हजार 661 नवीन रुग्ण सापडले. तर 705 जणांचा मृत्यू झाला. मात्र यात दिलासादायक बातमी म्हणजे जितका कोरोना रुग्णांचा आकडा वाढतो आहे, तितकंच रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढतं आहे. भारतात एकाच दिवसात सर्वात जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशात 24 तासांत 64% रुग्ण बरे झालेत अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 36,000 पेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांचा वाढत आकडा पाहून घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाला हरवणं शक्य आहे, हे या रिकव्हरी रेटवरून दिसून येतं. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण निरोगी झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - 31 जुलैनंतर काय होणार? अनलॉक-3 मध्ये शाळा-मेट्रो राहणार बंदच पण… देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे केंद्राची चिंता वाढली आहे. महिनाभरात ही संख्या कमी व्हायला लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र कोरोना हा काही लगेच जाणारा आजार नाही. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सरकार काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. PMOच्या नेतृत्वात काही तज्ज्ञांचे गट त्यावर अहवाल तयार करत असून त्यांच्या अहवालानंतर सरकार मोठे निर्णय घेणार आहे. उपचाराची दिशा, औषधं, नव्या आरोग्य सुविधा, संशोधनासाठीचे उपाय, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, अर्थचक्र पुन्हा रुळावर आणणे अशा सगळ्याच गोष्टींवर हे तज्ज्ञ शिफारशी करणार असून त्यानंतर सरकार प्रत्येक विभागासाठी दूरगामी निर्णय घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या टास्क फोर्सच्या कामकाजाबद्दल माहिती घेत असून ते सगळे अहवाल थेट पंतप्रधानांना दिले जाणार आहेत. हे वाचा - मुंबईतून चिंताजनक माहिती, एकाच वेळी 29 मतिमंद मुलांना कोरोनाची लागण दरम्यान भारताचा रिकव्हरी रेट हा जगभरातील इतर देशांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. तर मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. मात्र असे असले तरी, कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे. आपल्याला खूप जास्त सावधान रहावे लागणार आहे. कोरोना अजूनही तेवढाच धोकादायक आहे, जेवढा आधी होता. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’मध्ये बोललेत.