मायलेकींना चिरडलं
हैदराबाद, 4 जुलै : गेल्या दोनचार दिवसात महाराष्ट्रात अपघातांचं सत्रच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अनियंत्रीत कारच्या धडकेत मायलेकीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिलाही गंभीर जखमी झाली. दारूच्या नशेत असलेल्या 19 वर्षीय तरुणाने हा अपघात केला. कारचा वेग इतका जास्त होता की चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले होते. तीव्र वळण असूनही चालकाने नशेच्या धुंदीत ब्रेक लावण्याची तसदी घेतली नाही. यामुळेच चालकाने शेवटच्या क्षणी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला असता गाडीचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या महिलांवर जाऊन आदळली. या घटनेचा वेदनादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 48 वर्षीय अनुराधा आणि तिची मुलगी ममता असे मृत मायलेकींची नावे आहेत. गंभीर जखमी 36 वर्षीय मालविका ही अनुराधाची मैत्रिण आहे. तिघीही मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. मोहम्मद बदीउद्दीन खादरी असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो 19 वर्षांचा आहे असून अविनाश कॉलेज, हैदराबादमधून बीबीए करत आहे. सकाळी 6.11 वाजता हा अपघात झाला. तिघीही रस्त्याच्या कडेने चालल्या होत्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली.
वाचण्याची संधीच मिळाली नाही कुठल्यातरी घर किंवा संस्थेच्या गेटसमोर ही घटना घडली. कोणालाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही. हा वेदनादायक अपघात बाहेर बसवण्यात आलेल्या 2 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला. फुटेज शेअर करणाऱ्या व्यक्तीने ट्विटरवर लिहिले की, ‘जेव्हा रस्त्यावर चालण्यासाठी ट्रॅक आणि पार्क्स नसतील. उरलेली काही उद्याने धार्मिक संस्थांमध्ये रूपांतरित होतील, मग अशा प्रकारे रस्त्यावरून चालत लोकांना जीव गमवावा लागेल. हा दुर्दैवी अपघात आहे. यावर कृपया उपाय शोधा.