JOIN US
मराठी बातम्या / देश / बॉयफ्रेंडसोबत दुचाकीवर फिरत होती विवाहित महिला, पतीने पाहिलं अन् मग...

बॉयफ्रेंडसोबत दुचाकीवर फिरत होती विवाहित महिला, पतीने पाहिलं अन् मग...

पतीला पत्नी तिच्या प्रियकरासह दिसली होती.

जाहिरात

अनैतिक संबंध बातमी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

गुलशन कश्यप, प्रतिनिधी जमुई, 20 जून : बिहारच्या जमुईमध्ये रस्त्यावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. येथील जुन्या बाजारात एका विवाहितेला तिच्या प्रियकरासह दुचाकीवरून फिरताना पकडण्यात आले. पकडल्यावर महिला पतीसमोर खोटे बोलू लागली. आधी तिने सांगितले की बाईक चालवणारा तरुण तिचा मेहुणा आहे, पण नंतर तिने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचार आणि छळाचा आरोप केला. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी तेथे पोहोचून दोघांना समज दिली. या घटनेची परिसरात एकच चर्चा होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - मिळालेल्या माहितीनुसार, जमुई टाऊन पोलीस स्टेशन परिसरातील भाटचक येथील रहिवासी गोविंद पंडित याचा 2021 मध्ये जिल्ह्यातील गढी पोलीस स्टेशन क्षेत्रातील मुडवडो गावातील रहिवासी नीतू कुमारीसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले, पण हळूहळू सर्व काही बिघडू लागले.

गोविंद पंडितने सांगितले की, पत्नी माहेरी जात असल्याचे सांगून घरी गेली होती. पण एके दिवशी तो काही कामानिमित्त जमुई येथे आला होता. येथे त्याने पत्नी नीतू हिला दुसऱ्या तरुणासोबत दुचाकीवरून जाताना पाहिले आणि मी त्यांच्या मागोमाग त्या दोघांना जुन्या बाजारात पकडले. पकडले गेल्यावर प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली नीतू एकामागून एक खोटे बोलू लागली. सुरुवातीला तिने आजारी असून उपचारासाठी आल्याचे सांगितले. गोविंदने थोडी काटेकोरपणे चौकशी केली असता तिने सांगितले की, कार चालवणारी व्यक्ती तिचा मेव्हणा आहे, परंतु जेव्हा त्याला हे खोटे वाटले, तेव्हा महिलेने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. महिलेने केला हा आरोप - नीतूने सांगितले की, लग्नापासून तिचा पती गोविंद पंडित दारू पितो आणि भांडतो. म्हणूनच तिला त्याच्यासोबत राहायचे नाही. तिच्या आईने तिचे झाझा पोलीस स्टेशन हद्दीतील राजला गावातील रहिवासी सोनू कुमार याच्यासोबत नातं जोडलं असून ती त्याच तरुणासोबत जात होती. त्यामुळे महिलेने पतीसोबत राहण्यास नकार दिला आहे. रस्त्यावरील कौटुंबिक वादाची माहिती मिळताच पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी नीतू आणि गोविंद पंडित यांना समज देऊन पोलिस ठाण्यात नेले. दोन्ही बाजूने कोणती तक्रार न आल्याने दोघांना सोडून देण्यात आले. नीतूला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले, तर गोविंद पंडित यालाही घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. सध्या ही घटना चर्चेचा विषय ठरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या