rahul gandhi
दिल्ली, 26 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसंच पंतप्रधान मोदींवरही टीका केली. राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेवेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, मोदी आडनावावर केलेल्या वक्तव्याला भाजपने ओबीसींचा अपमान असल्याचं म्हटलंय. यावर तुमचे काय म्हणणे आहे. पत्रकाराच्या या प्रश्नानंतर राहुल गांधी भडकले आणि त्यांनी म्हटलं की, भाजपसाठी इतकं थेट काम का करताय? प्रश्न थोडा फिरवून विचारा. इतकं दबावाखाली काम करू नका. हवा निघाली का? राहुल गांधी म्हणाले की, भारत जोडो यात्रेतलं माझं कोणतंही भाषण घ्या. मी नेहमीच म्हटलं आहे की सर्व समाज एक आहे. द्वेष, हिंसा होऊ नये. हा ओबीसींचा मुद्दा नाही. भाजप मुख्य मुद्द्यापासून लक्ष वळवण्याचं काम करतेय. कधी ओबीसीवर बोलतील, कधी परदेशातल्या गोष्टी सांगतील असंही राहुल गांधींनी म्हटलं. ‘भाजपचा बिल्ला छातीला लावा’, राहुल गांधींकडून पत्रकाराचा अपमान
पत्रकाराच्या प्रश्नानंतर राहुल गांधी म्हटलं की, पत्रकार असल्याचं नाटक करू नका? चांगले प्रश्न का विचारत नाही आहात? हे स्पष्ट दिसतंय की भाजपसाठी काम करताय. प्रश्न थोडा फिरवून का नाही विचारत असंही राहुल गांधींनी विचारले. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत आपल्यावर संसदेत खोटे आरोप झाल्याचं म्हटलं. तसंच याबाबत आपण लोकसभा अध्यक्षांना सविस्तर पत्र लिहिल्याचंही राहुल गांधींनी सांगितलं. या पत्रकार परिषदेवेळी काँग्रेस नेते जयराम रमेश, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि अभिषेक मनु सिंघवी हेसुद्धा उपस्थित होते. माझं नाव गांधी आहे, सावरकर नाही. गांधी माफी मागत नाहीत अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्य प्रकरणी माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं.