JOIN US
मराठी बातम्या / देश / नातवाला दूध मिळावं म्हणून 80 वर्षाच्या आजीनं विकली जमीन !

नातवाला दूध मिळावं म्हणून 80 वर्षाच्या आजीनं विकली जमीन !

New Born Baby : नवजात बालकाला दूध मिळावं म्हणून 80 वर्षाच्या आजीनं आपली जमीन विकली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रांची, 08 जुलै : झारखंडच्या गुमलामध्ये मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. नवजात नातवाला दूध मिळावं म्हणून 80 वर्षाच्या आजीनं जमीन विकली आहे. मुलगा आणि सुनेचं निधन झाल्यानंतर नातवाला सांभाळण्याची जबाबदारी आजीवर आली. नातू कुपोषित आहे. त्याचं पालनपोषण नीटपणे व्हावं यासाठी आजीनं आपली जमीन विकली. सध्या या मुलाची प्रकृती ठिक असून ही सारी घटना मन सुन्न करणारी आहे. दरम्यान, मला माझी नाही तर माझ्या नातवाची काळजी आहे. नातवाला जिवंत ठेवण्यासाठी जमिन विकली. त्यातून दूधाचा खर्च भागत आहे. यापुढे कुठून मदत मिळाली असती तर बरं झालं असतं. माझं वय देखील झालं आहे. माझ्यानंतर नातवाला कोण बघणार? हीच चिंता वाटत असल्याची भावना या 80 वर्षाच्या आजीनं व्यक्त केली आहे. कर्नाटकात Congress – JDS सरकार समोरच्या अडचणी वाढल्या मुलगा आणि सुनेचा मृत्यू झारखंडमधील सनियाकोना या गावात 80 वर्षाची आजी आपला मुलगा आणि सुनेसोबत राहत होती. कलारा कुल्लु असं या आजीचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वी कलारा कुल्लु यांनी आपला मुलगा गमावला. त्यानंतर नातवाला जन्म देताना सुनेचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे नवजात नातवाची जबाबदारी 80 वर्षाच्या कलारा कुल्लु यांच्यावर आली. नातू हाच आता कलारा कुल्लु यांच्यासाठी सर्वस्व. त्याचा पालनपोषणासाठी कलारा कुल्लु यांनी आपली जमीन देखील विकली. जन्मत: नातू कुपोषित होता. पण, त्याच्या प्रकृतीमध्ये आता सुधार होत आहे. त्यामुळे आजीच्या चेहऱ्यावर समाधान आहे. पण, नातवाचं पुढं काय? असा प्रश्न आता वय झालेल्या कलारा कुल्लु यांना पडला आहे. तशी चिंता त्या बोलून देखील दाखवत आहेत. VIDEO: निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, राज ठाकरे दिल्ली दरबारी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या