अनमोल कुमार, प्रतिनिधी मुजफ्फरनगर, 15 मार्च : यूपीच्या मुझफ्फरनगरमध्ये बँड वाजवत मिरवणुकीत वराचे आगमन झाले होते. मात्र, तेव्हाच एकच खळबळ उडाली. वराच्या बाजूच्या लोकांनी लग्नाआधी वधूपक्षाच्या लोकांकडून हुंड्यात 8 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि 4 लाख रुपये किमतीचा ट्रॉली मागितली. वरमुलगा आणि त्याचे वडील यांनी हुंड्यात ट्रॅक्टर मागितले. तसेच विना हुंड्याचा लग्नाला नकार दिला. यानंतर संतापलेल्या तरुणीच्या बाजूच्या लोकांनी वऱ्हाडी आणि वरातीला ओलीस ठेवले. यानंतर या प्रकरणाची पोलिसात तक्रार करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरच्या भारतीय किसान युनियनचे गाव अध्यक्ष आस मोहम्मद यांच्या भाची मेहशरचे लग्न होते. कुऱ्हेडी गावात हा लग्नाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तर मेहशरची मुलगी फरमान हिचा विवाह शामली जिल्ह्यातील भैसानी गावात राहणाऱ्या वसीमशी होणार होता. गावात वरात आल्यावर नाश्ता करण्यात आला. मात्र, जेवण झाल्यानंतर वराती लग्नात बसले असताना वसीमने हुंडा म्हणून ट्रॅक्टर-ट्रॉलीची मागणी केली, असा आरोप आहे. यानंतर मुलीने स्वत:ला गरीब असल्याचे सांगत हुंड्यात ट्रॅक्टर ट्रॉली देण्यास असमर्थता व्यक्त केली. यानंतर वराच्या बाजूच्या लोकांनी लग्नाला नकार दिला. त्यावरून गदारोळ झाला. शेतकऱ्याच्या लेकीचा कौतुकास्पद निर्णय! 17 वर्षांची शुभावरी करतेय सेंद्रिय शेती वऱ्हाडींसह बारातलाही ओलीस ठेवले - हुंडा म्हणून ट्रॅक्टर-ट्रॉलीची मागणी केल्याची माहिती ग्रामस्थ आणि भारतीय किसान युनियनच्या नेत्यांना समजताच त्यांनी वऱ्हाडीसह लग्नाची मिरवणूक ओलिस ठेवले. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. यावेळी आजूबाजूच्या गावातील लोकांनी आणि पाहुण्यांनी वरातींना पंचायत बसवली. या प्रकरणाबाबत वरमुलगा वसीम म्हणाला की, मी हुंड्यात ट्रॅक्टर मागितला होता, त्यामुळे मला ओलीस ठेवण्यात आले आहे. कुल्हारी गावात आम्ही वरात आणली होती. मला लग्न करायचे आहे. वधूने लग्नास नकार दिला - वधू मेहशर खातून हिने म्हणण्यानुसार, लग्नाची वरात आल्यानंतर वर वसीमने ट्रॅक्टर मागितला. 2 वर्षांपूर्वी माझे लग्न जमले होते. त्याने हुंड्यात ट्रॅक्टर मागितला असता आम्ही लग्नास नकार दिला. मला त्याच्याशी लग्न करायचे नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात वधू आणि तिच्या कुटुंबीयांनी या लग्नाला नकार देत हुंडा मागणाऱ्या कुटुंबाशी असलेले नाते तोडले आहे. दुसरीकडे याप्रकरणी कोणतीही लेखी तक्रार नसताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.