JOIN US
मराठी बातम्या / देश / लॉकडाऊनमध्ये चांगली बातमी! देशातील बेरोजगारीचा दर झाला कमी, काय आहेत कारणं?

लॉकडाऊनमध्ये चांगली बातमी! देशातील बेरोजगारीचा दर झाला कमी, काय आहेत कारणं?

सध्या मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार घरी जात आहेत. यानंतर हे चित्र बदलू शकत

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 एप्रिल : लॉकडाऊन दरम्यान अंशिक सूट दिल्यानंतर आता बेरोजगारीचा दर (Unemployment Rate) कमी झाला आहे. नियंत्रित व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेमुळे 26 एप्रिल रोजी संपलेल्या तिमाहीत बेरोजगारीच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग ऑफ इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या आकडेवारीनुसार भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 21.05 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. यापूर्वी 19 एप्रिलपर्यंत ते 26.19 टक्के होते. ग्रामीण भागातही परिस्थिती सुधारली देशातील लोकशक्तीचा एक मोठा भाग ग्रामीण भागातील  रोजगाराचा आहे. 26 एप्रिलपर्यंतचा बेरोजगारीचा दर हा 19 एप्रिलच्या 26.69 टक्क्यांच्या तुलनेत 20.88 टक्क्यांपर्यंत होता. एप्रिलच्या सुरूवाती हा पहिला आठवडा असा होता, जिथे ग्रामीण रोजगारामध्ये घट झालेली नाही. लाइव्हमिंट यांनी दिलेल्या अहवालानुसार लेबर इकॉनॉमिस्ट केआर श्यामसुंदर यांचा हवाला आपल्या अहवालात दिला आहे. ही एक सकारात्मक गोष्ट आहे. परंतु यामुळे कोणालाही आनंद होणार नाही हे ही खरं आहे. ग्रामीण भागात काम सुरू झाल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे, परंतु स्थलांतरितांना घरी बोलावून समस्या वाढू शकते. यानंतर या आकडेवारीत बदल होऊ शकतो. सरकारने योग्य नियोजन न केल्यास समस्या उद्भवतील 15 मार्चपासून बेरोजगारीच्या दरात सतत घट अर्थव्यवस्थेच्या बाबतीत (Indian Economy) ही आकडेवारी फारशी विशेष नाही. परंतु वाढत्या बेरोजगारीच्या परिस्थितीत हा एक छोटासा दिलासा आहे. कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे 15 मार्चपासून बेरोजगारीचे प्रमाण सतत वाढत आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे प्रत्येक क्षेत्रात व्यवसाय पूर्ण ठप्प झाला आहे. संबंधित - कोरोना योद्धा शेवटच्या श्वासापर्यंत लढला; लेक करणारं त्यांचं अधूरं स्वप्न पूर्ण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या