JOIN US
मराठी बातम्या / देश / Goa Election 2022 : 'तिन्ही अपक्षांचा भाजपला पाठिंबा'; आजच करणार सत्तास्थापनेचा दावा, 'या'दिवशी शपथविधी

Goa Election 2022 : 'तिन्ही अपक्षांचा भाजपला पाठिंबा'; आजच करणार सत्तास्थापनेचा दावा, 'या'दिवशी शपथविधी

आजच भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. तर 14 मार्चला भाजपचा शपथविधी होणार असल्याचं समोर आलं आहे (Oath Taking Ceremony in Goa).

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पणजी 10 मार्च : गोवा हे अगदी छोटं राज्य असलं आणि तिथे केवळ 40 जागांसाठी विधानसभा निवडणूक झाली असली (Goa Assembly Election Result 2022), तरी हे राज्य अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे गोव्याच्या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले आहेत. सध्या गोव्यात भाजप आघाडीवर दिसत आहे. मात्र, एक्झिट पोलनुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई असेल, असं स्पष्ट झालं होतं. अशात भाजप आता सावध पवित्रा घेत आहे. आजच भाजप राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. तर 14 मार्चला भाजपचा शपथविधी होणार असल्याचं समोर आलं आहे (Oath Taking Ceremony in Goa). उत्तरप्रदेशात बसपाचा दारूण पराभव, मतमोजणी दरम्यान BSP पोलिंग एजंटला Heart Attack गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये नेमकं कोणतं सरकार येणार, असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असताना आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठा दावा केला आहे. गोव्यात तिन्ही अपक्षांनी भाजपला पाठिंबा दर्शवला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आमचं त्यांच्यासोबत बोलणं झालं असून जे जे आमच्या सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही सरकार स्थापन करू, असं सावंत म्हणाले गोव्यातील राजकारणाची आतापर्यंतची परिस्थिती पाहिली तर इथे अगदी शेवटच्या क्षणाला काहीही होऊ शकतं. मागील निवडणुकीतही असंच घडलं. 2017 साली काँग्रेसने 40 पैकी 17 जागा जिंकल्या आणि तीन जागा जिंकलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टीसह अनौपचारिक आघाडीही केली होती; मात्र केवळ 13 जागा जिंकलेल्या भाजपने राजकीय खटपटी करून सरकार स्थापन करण्यात यश प्राप्त केलं होतं. त्यामुळे यावेळी कोणाला बहुमत मिळतं का आणि ते नाही मिळालं तर कोणाची कोणाशी आघाडी होते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरत आहे. या परिस्थितीच आता भाजपनं शपथविधीची तारीखही ठरवली असल्याने सध्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. News18 च्या आकडेवारीनुसार भाजपने 6 जागा जिंकल्या असून 13 गोवा विधानसभा मतदारसंघात आघाडीवर आहे. काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर असून तीन जागा जिंकल्या आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार TMC 3, AAP 2 आणि अपक्ष उमेदवार 4 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहेत. सध्याची आकडेवारी बघता भाजप आघाडीवर असल्याचं दिसत आहे. Goa Assembly Election Result 2022 : मुख्यमंत्री प्रमोद सावंत विजयी भाजपला मात्र आपल्याला बहुमत मिळणार असल्याचा विश्वास आहे. याच पार्श्वभूमीवर 14 मार्चला शपथविधी ठरवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या