सूरत, 4 मे : अनेक राज्यांकडून मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या स्थानिक पातळीवर मजुर, विद्यार्थी यांची नोंदणी केली जात आहे. कोविड - 19 (Coronavirus) ची तपासणी केल्यानंतर त्यांचा निकाल निगेटिव्ह आला असेल तरच त्यांना जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. अन्यथा त्यांना तत्सम राज्यात राहून क्वारंटाइन करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगितले आहे. मात्र अनेक भागांमध्ये मजुरांनी सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. गुजरातमधील (Gujrat) सूरत येथील स्थलांतरित मजूर रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या गावी जाण्याचा हट्ट करीत ते आक्रमक झाले आहेत. यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला आहे. याबाबतचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने मजूर रस्त्यावर दिसत आहे. त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांची मोठी टीम तैनात करण्यात आली आहे.
यापूर्वी मुंबईतील वांद्रे येथे चुकीचा संदेश व्हायरल झाल्यामुळे मोठ्या संख्येने मजुर जमा झाले होते. यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची ऐशीतैशी झाली होती. अशा घटनांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची भीती असते. त्यामुळे पोलिसांकडून या जमावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही गुजरातमध्ये अशाच स्वरुपाचा मजुरांचा आक्रोश समोर आला होता. संबंधित - SPECIAL REPORT : राज्यात दारू विक्री का आहे महत्त्वाची? एकदा आकडेवारी पाहाच!