यमुदा नदी
आशीष त्यागी, प्रतिनिधी बागपत, 26 जुलै : सध्या देशात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थितीही निर्माण झाली आहे. अशातच उत्तरप्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे बागपत येथील सुभानपूर परिसरातील स्थानिकांना पूर परिस्थितीचा धोका वाटत आहे. नेमकं काय घडलं - उत्तर प्रदेशातील बागपत येथील सुभानपूर यमुना खादर येथे 13 जुलैला यमुना नदीच्या बंधाऱ्याला तडा गेला होता. यामुळे शेतकऱ्यांची शेकडो बिघा पिके पाण्याखाली गेली होती. तसेच स्थानिक भागातील रहिवासी ठिकाणीही पाणी शिरले होते. यानंतर पाटबंधारे विभागाचे अधिकारी, NDRF टीम, ग्रामस्थ आणि इतर लोकांच्या मदतीने सुमारे 1 आठवड्याच्या अथक परिश्रमानंतर बंधारा पूर्णपणे दुरुस्त करण्यात आला. यानंतर स्थानिक आता 24 तास बंधाऱ्याभोवती उपस्थित राहून लक्ष ठेऊन आहेत.
यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकारीही बंधाऱ्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. यमुना नदीत पाणी सोडण्यात आले. त्यामुळे यमुना नदीच्या पाण्याची पातळी पुन्हा वाढू लागली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. बंधारा तुटल्याने शेतकरी निराश झाले होते. यानंतर आता बंधारा दुरुस्त झाला आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांसह ग्रामस्थ बंधाऱ्यावर लक्ष ठेवून आहेत. 24 तास दिला जातो आहे पहारा - सुभानपूर गावचे सरपंच गजेंद्र सिंह यांनी सांगितले की, या बंधाऱ्याकडे बारीक लक्ष ठेवले जात आहे. ग्रामस्थ हे रात्रंदिवस याठिकाणी पहारा देत आहेत. इतकेच नव्हे तर यासोबतच पाटबंधारे विभागाचे अधिकारीही या बंधाऱ्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. तसेच या बंधाऱ्याजवळ जेसीबीही तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.