नवी दिल्ली, 23 मार्च : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 22 मार्च, रविवारी देशभरात जनता कर्फ्यू जाहीर केला होता. या दरम्यान लोकांना घरातून बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली होती. तर सायंकाळी पाच वाजता टाळ्यांच्या कडकडीत वैद्यकीय सेवांशी संबंधित लोकांचे आभार मानावे, असे आवाहन केले होते. दरम्यान लोकांनी मोदींच्या आदेशाचे पालन केले. मात्र यादरम्यान सोशल मीडियावर फेक मेसेज पाठवले जात होते. तुम्हीही हा मेसेज फॉरवर्ड केले असेल तर वाचा काय आहे या मागचे सत्य. तुम्हाला आठवत असेल की दरवर्षी दिवाळीच्या दुसर्या दिवशी भारताच्या नकाशाचा एक फोटो व्हायरल होत असतो. हा फोटो नासाने टीपलेली भारताची दिवाळी असा पसरत असतो. असाच एक फोटो आणि मेसेज जनता कर्फ्यूनंतर व्हायरल होत होता. यात असा दावा करण्यात आला होता की, नागरिकांनी कर्फ्यूमध्ये सायंकाळी 5 वाजता वाजवलेल्या टाळ्यांचा व्हिडिओ नासाने थेट प्रसारित केला. इतकेच नव्हे तर असा दावा देखील केला गेला आहे की, या टाळ्यांचा आवाज नासाच्या उपग्रहापर्यंत गेला. यामुळे आकाशात ध्वनिकंप तयार झाले. यामुळे टाळ्यांचा कडकडाट सुरू झाल्यावर कोरोना विषाणू कमकुवत झाला. सतर्क राहा! कोल्हापुरात दुबईहून आलेला कोरोना संशयित पळाला एवढेच नाही तर UNESCO कोरोनाव्हायरसवर मात करण्यासाठी वापरलेला मार्ग सर्व देशांनी वापरावा असे आवाहन केले आहे असाही मेसेज व्हायरल होत होता.मात्र हे सर्व मेसेज फेक असून नासाने थेट प्रसारण केले नव्हते. तसेच नासाकडे आकाशातील ध्वनिकंप मोजण्याचे साधन ही नाही आहे. त्यामुळे असे मेसेज पुढे पाठवताना त्याची तपासणी करा. जागावरचे कोरोनाचे संकट वाढले कोरोनासारख्या संकटाशी जगातील सर्व देश एकत्रितपणे सामना करत आहेत. या विषाणूमुळे 13 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 3 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. भारतातही दिवसेंदिवस याचा धोका वाढत आहे. यामुळेच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. या अंतर्गत लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. या जनता कर्फ्यू ला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र नासाच्या नावाने फेक मेसेजही व्हायरल केले. महाभयंकर Coronavirus ची कमजोरी सापडली, अशी करता येऊ शकते मात