Home /News /news /

सतर्क राहा! कोल्हापुरात दुबईहून आलेला कोरोना संशयित पळाला

सतर्क राहा! कोल्हापुरात दुबईहून आलेला कोरोना संशयित पळाला

दुबईवरून आलेल्या 28 वर्षीय कोरोना संशयित रुग्ण पळून गेला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.

    कोल्हापूर, 24 मार्च : जगभरात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असल्यामुळे प्रत्येक देशात या आजाराने थैमान घातलं आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अशात प्रत्येकाला घरात राहण्याचे आदेश देण्यात आले असताना कोल्हापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संशयित सीपीआर रुग्णालयातून पळाला असल्याचं सांगण्यात येत आहे. दुबईवरून आलेल्या 28 वर्षीय कोरोना संशयित रुग्ण पळून गेला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. रुग्णाला पकडण्यासाठी पोलिसांची धावाधाव सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी रुग्ण दाखल झाला होता. पण आज सकाळच्या सुमारास तो रुग्णालयातून पळून गेला. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यात गावांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ गाव पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. गावात येणारे तीन रस्ते बंद केले. मोठे दगड टाकून नागरिकांकडून रस्ते बंद करण्यात आले आहेत. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश नाकारण्यात आला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन, आतापर्यंत 471 जणांना कोरोनाची लागण देशभरात कोरोनाचा संसर्ग मागच्या काही दिवसांत वेगानं पसरताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 470 हून जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत 80 हून अधिक कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरातील 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन तर अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई केली जाणार आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या