JOIN US
मराठी बातम्या / देश / केंद्र सरकारची 11 औषध कंपन्यांवर सर्वात मोठी कारवाई, 2 कंपन्यांना ठोकलं टाळं

केंद्र सरकारची 11 औषध कंपन्यांवर सर्वात मोठी कारवाई, 2 कंपन्यांना ठोकलं टाळं

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशात भारतीय औषधांवर प्रश्न उपस्थित झाल्यापासून, DCGI आणि राज्य औषध नियामकाने उत्पादनाची गुणवत्ता तपासायला सुरुवात केली आहे.

जाहिरात

औषधं कंपनी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली : डोकं दुखलं किंवा थोडं जरी दुखणं जाणवलं तरी लगेच रिलिफ मिळण्यासाठी पटकन मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतो. मात्र आता तसं करणं महागात पडू शकतं. गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 11 कंपन्यांवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. परदेशात भारतीय औषधांवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. औषधांच्या गुणवत्तेबाबत शासनाकडून तपासणी मोहीम घेण्यात आली. याचे नियमही अधिक कडक ठेवण्यात आले आहेत. गेल्या 6 महिन्यांत देशातील 134 औषध कंपन्यांची तपासणी करण्यात आली. हिमाचल प्रदेशमध्ये सरकारने सर्वात मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत हिमाचल प्रदेशातील २६ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 11 कंपन्यांवर स्टॉप प्रोडक्शन ऑर्डर लागू करण्यात आली असून दोन फार्मा कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशात भारतीय औषधांवर प्रश्न उपस्थित झाल्यापासून, DCGI आणि राज्य औषध नियामकाने उत्पादनाची गुणवत्ता तपासायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 134 औषध कंपन्यांची तीन वेगवेगळ्या टप्प्यात तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून राज्यांमधून नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी ड्रग (एनएसक्यू) औषध उत्पादनाचा रेकॉर्ड असलेल्या कंपन्यांच्या नावांचा डेटा तयार करण्यात आला होता. 2019-22 मध्ये 11 पेक्षा जास्त वेळा NSQ (नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी ड्रग) मध्ये अयशस्वी झालेल्या कंपन्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल, तेलंगणा, पुद्दुचेरी, केरळ, जम्मू, सिक्कीम, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये 1-1 औषधी कंपन्यांची तपासणी करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातील 26 युनिट्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या