JOIN US
मराठी बातम्या / देश / जनतेमध्ये घबराट! कोरोनाची लक्षणं नसल्यास 24 तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज

जनतेमध्ये घबराट! कोरोनाची लक्षणं नसल्यास 24 तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज

रुग्ण 1 मिनिटांत 30 वेळा श्वास घेत असतील तर परिस्थिती गंभीर असल्याचे या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 6 जून : एकीकडे राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूचे (Covid -19) रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, दुसरीकडे सरकार प्रतिबंधित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा दावा करीत आहे. स्वत: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी (CM Arvind Kejriwal) यांनी आज माध्यमांशी बोलताना खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचा कडक इशारा दिला आहे. त्याचबरोबर दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने राजधानीतील रुग्णालयांना एक आदेश दिला असून तो धक्कादायक आहे. आरोग्य विभागाने दिल्लीतील रुग्णालयांना सूचना दिली आहे की, ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत किंवा सौम्य लक्षणे दिसत आहेत (Asymptomatic and Mild cases) त्यांना 24 तासांच्या आत रुग्णालयातून सोडण्यात यावे. सरकारचा हा आदेश शनिवारी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार जारी करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

माध्यमांच्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दिल्लीत लक्षणं कमी दिसणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. अशा रुग्णांवर घरीच उपचार करता येतात. सत्येंद्र जैन असेही म्हणाले की, कमी लक्षणे असलेल्या पेशंटकडून कोरोना इन्फेक्शनची शक्यता कमी असते. आरोग्यमंत्री म्हणाले की, ज्या लोकांना ताप किंवा सर्दी-खोकलाची लक्षणे आहेत, त्यांना अशा परिस्थितीत रुग्णालयात भरती करण्यात येईल. जैन यांनी कोरोनाची लक्षणे स्पष्ट करताना सांगितले की, एखाद्या व्यक्तीच्या श्वासोच्छवासाचे प्रमाण एका मिनिटात 15 वेळा असेल तर त्याला कमी लक्षणांच्या श्रेणीमध्ये स्थान दिले जाईल. त्याच वेळी, एका मिनिटात 30 वेळा श्वासोच्छवासाचा दर गंभीर प्रकारात आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांना पूर्ण सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे. त्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे थांबलेली नाहीत. गेल्या काही दिवसांत दिल्लीतील कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढली आहे, अशा परिस्थितीत आरोग्य विभागाच्या या आदेशाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आज सकाळी स्वत: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोना बाधित रूग्णांच्या उपचाराबाबत खासगी रुग्णालयांच्या वागणुकीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. कोरोना रूग्णांच्या उपचारात निष्काळजीपणाने किंवा उपचारांना नकार देणाऱ्या रुग्णालयांना त्यांनी कडक इशारा दिला आहे. हे वाचा - धक्कादायक! कोरोनासाठी PM Cares मध्ये BJP व सपा नेत्यांनी दिले बनावटी चेक

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या