मुंबई, 31 ऑगस्ट : राज्यात कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आद दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला होता. त्याला मुंडेंनी उत्तर दिलं आहे. उस्मानाबादमध्ये हप्ता मागणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. नोएडातील ट्विन टॉवरप्रमाणे मुंबईतील इमारतींची अवस्था होणार असल्याचा इशारा बॉम्बे हायकोर्टाने दिली आहे. कोविडवर नवीन उपचार मिळाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. यासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी काही मिनिटांत वाचा. मुख्यमंत्र्यांच्या टोल्यावर धनंजय मुंडेंचा शायरीतून पलटवार! नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडेंवर (CM Eknath Shinde vs Dhananjay Munde) करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यावरून अप्रत्यक्ष निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या टोलेबाजीला धनंजय मुंडे यांनी परळीत नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातून अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं. राहत इंदोरी यांचा एक शेर धनंजय मुंडे यांनी म्हंटला. माझ्यावर राजकीय, कोव्हिड अशी अनेक संकटं आी, पण तुम्ही माझ्यासोबत आहात, त्यामुळे मी जगात कोणालाच भित नाही, असं मुंडे म्हणाले. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. अब्दुल सत्तारांच्या हाती भगवा झेंडा सिल्लोड शहरातील सगळ्या गणेश मंडळांनी वाजतगाजत गणरायाचे स्वागत केले. युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar in Ganeshotsav) यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील हातात भगवा झेंडा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. महामार्गावर वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी उस्मानाबादमध्ये हप्ता मागणारा वाहतूक पोलीस कर्मचारी कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. शहाजीबापू-मिटकरींमध्ये वार-पलटवार! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (Amol Mitkari vs Shahaji Bapu Patil) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबईच्या इमारतीचीही होणार ‘ट्विन टॉवर’ सारखी अवस्था नोएडामधली भ्रष्टाचाराची इमारत असलेल्या ट्विन टॉवरला (Noida Tween Tower) उद्धवस्त करून अजून आठवडाही झालेला नाही, त्यातच मुंबईतल्या बिल्डरबाबत (Mumbai SRA Builder) बॉम्बे हायकोर्टाने (Bombay High Court) दिलेल्या इशाऱ्यामुळे संकट वाढलं आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आसाम सरकारने मदरश्यावर चालवला बुल्डोझर आसाम सरकारच्या यंत्रणांनी बोनगाईगावमधल्या एका मदरश्यावर बुल्डोझर (Assam Madarsa JCB) चालवला आहे. मदरश्याच्या जागेचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असल्याच्या आरोपामुळे आसाम सरकारने ही कारवाई केली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सोनिया गांधींच्या आईचं निधन सोनिया गांधी यांच्या आई (Sonia Gandhi Mother Death) पाओला माईनो यांचं शनिवार 27 ऑगस्टला निधन झालं आहे. 30 तारखेला पाओला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इटलीमधल्या त्यांच्या घरी पाओला माईनो यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. COVID-19 वर संशोधकांना मिळाला नवा उपचार संशोधकांनी कोविड-19 रोगासाठी एक नवीन उपचार शोधला आहे. हा उपाय भविष्यात व्हायरसच्या नवीन प्रकारांपासून संरक्षण देखील प्रदान करू शकते, असा त्यांचा दावा आहे. यूकेमधील केंट विद्यापीठ आणि जर्मनीतील गोएथे विद्यापीठातील (Goethe University) संशोधकांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय पथकाने SARS-CoV-2 Omicron आणि डेल्टा व्हायरसच्या संवेदनाक्षमतेची चाचणी केली. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.