सिल्लोड, 31 ऑगस्ट : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात गणरायाचे थाटात आगमन झालं आहे. सिल्लोड शहरातील सगळ्या गणेश मंडळांनी वाजतगाजत गणरायाचे स्वागत केले. युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar in Ganeshotsav) यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील हातात भगवा झेंडा घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतला. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे गणेशोत्सव घरातच साध्या वातावरणात साजरा करावा लागला. सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने गणेशोत्सवाची सर्वांनाच उत्सुकता आहे, असं म्हणत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
अब्दुल सत्तारांच्या हाती भगवा झेंडा, सिल्लोडच्या गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी#GaneshChaturthi2022 #GanpatiBappaMorya #AbdulSattar pic.twitter.com/2poMLtQL3S
— News18Lokmat (@News18lokmat) August 31, 2022
सत्तार अडचणीत टीईटी परीक्षांमधल्या घोटाळ्यामुळे सत्तार त्यांच्या मुलांमुळे अडचणीत आले होते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या एक दिवस आधी सत्तारांच्या मुलांची नावं समोर आल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळतं का नाही, याबाबतही शंका उपस्थित करण्यात आली, पण अखेर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. टीईटी प्रकरणात मुलांची नावं आल्यानंतर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तारांवर आणखी आरोप केले. सत्तार यांच्या संस्थेतील 10 ते 12 जणांची नाव आहे, असा खळबळजनक आरोप दानवे यांनी केला.