जाहिरात
मराठी बातम्या / देश / BREAKING : सोनिया गांधींच्या आईचं निधन, इटलीमध्ये घेतला अखेरचा श्वास

BREAKING : सोनिया गांधींच्या आईचं निधन, इटलीमध्ये घेतला अखेरचा श्वास

सोनिया गांधी

सोनिया गांधी

सोनिया गांधी यांच्या आई (Sonia Gandhi Mother Death) पाओला माईनो यांचं शनिवार 27 ऑगस्टला निधन झालं आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : सोनिया गांधी यांच्या आई (Sonia Gandhi Mother Death) पाओला माईनो यांचं शनिवार 27 ऑगस्टला निधन झालं आहे. काल म्हणजेच 30 तारखेला पाओला यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. इटलीमधल्या त्यांच्या घरी पाओला माईनो यांनी अखेरचा श्वास घेतला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी बरेच वेळा त्यांच्या उपचारासाठी इटलीलाही जात होते. मागच्याच आठवड्यात सोनिया गांधी या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत आईला भेटण्यासाठी इटलीला गेल्या होत्या.

जाहिरात

मागच्या काही वर्षांमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी अनेक वेळा इटलीला गेले होते. 2020 साली राहुल गांधींच्या वारंवारच्या परदेश दौऱ्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती, तेव्हा काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली. राहुल गांधी इटलीला त्यांच्या आजारी आजीला भेटायला जात असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात