जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'जॉनी लिव्हर, संजय राऊत आणि गुरू', शहाजीबापू-मिटकरींमध्ये वार-पलटवार!

'जॉनी लिव्हर, संजय राऊत आणि गुरू', शहाजीबापू-मिटकरींमध्ये वार-पलटवार!

Shahaji Bapu Patil-Amol Mitkari

Shahaji Bapu Patil-Amol Mitkari

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (Amol Mitkari vs Shahaji Bapu Patil) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 31 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (Amol Mitkari vs Shahaji Bapu Patil) यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली आहे. शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या टीकेवर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अमोल मिटकरी हे पात्र राजकारणात नवं आहे. मिटकरीने संजय राऊतांना गुरू मानलं आहे, असं मला वाटतं. राऊतांचं जे झालं ते एक दिवस याचं होणार. शरद पवार यांनी चुकीची केलेली निवड म्हणजे अमोल मिटकरी’, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. शहाजीबापूंच्या या टीकेवर अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. ‘शहाजीबापू पाटील शिंदे गटाचे जॉनी लिव्हर आहेत. महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस त्यांच्याकडे करमणूक म्हणून पाहतो. माझ्या भविष्याची चिंता त्यांनी करू नये. शिंदे गटाचा कसा कार्यक्रम वाजला आहे, याची चिंता करावी. स्वत:च्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावं. हा महाराष्ट्राची करमणूक करणारा नवीन जॉनी लिव्हर आहे’, असं प्रत्युत्तर अमोल मिटकरी यांनी दिलं. ‘काय झाडी, काय डोंगर आणि हॉटेल, सगळं ओक्केमध्ये आहे’, असा डायलॉग आठवला की आपल्या डोळ्यांसमोर लगेच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचा चेहरा उभा राहतो. राज्याच्या राजकारणात दोन महिन्यांपूर्वी प्रचंड घडामोडी घडल्या. महाराष्ट्रात सत्तांतर घडलं. या सत्तांतरमध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचादेखील सहभाग होता. शहाजी बापू यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला नाकारलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ पकडली. महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत शहाजी बापू पाटील हे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. यादरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपकडून प्रत्येक आमदाराला 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे ‘50 खोके, एकदम ओके’, असं शिंदे गटाच्या आमदारांना डिवचण्यासाठी एक ब्रीदवाक्यच विरोधकांचं झालं आहे. बैलपोळ्याच्या दिवशी हे ब्रीद वाक्य अनेक शेतकऱ्यांनी बैलांवर लिहिलं होतं. त्यामुळे खोके हा शब्द आणि शिंदे गट यांचा वारंवार संबध जोडला जातो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात