रायसेन, 13 जून : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक राजकीय नेत्यांपासून आयएएस अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. कोरोनाच्या संकटात सर्वांनीच अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. नायब तहसीलदार शिवांगी खरे यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. रायसेन येथील प्रभाग क्रमांक 13 मध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण मिळाल्यानंतर हा परिसर कंटेन्मेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याच वेळी, रुग्णांच्या संपर्कात असलेल्या लोकांबद्दल माहिती गोळा केली जात आहे. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या नातेवाईकांना घरी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते, परंतु हे लोक सर्व बाजारपेठेत व आसपासच्या भागात फिरत असल्याची माहिती समोर आली होती. ज्यानंतर प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली होती. त्या आधारे, प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह कुटुंबाना नेण्यासाठी पोहोचले आणि कोरोना पॉझिटिव्हच्या दहा नातेवाईकांना रूग्णवाहिकेतून वसतिगृहातील कोविड सेंटर येथे नेले. दरम्यान, नायब तहसीलदार शिवांगी खरे यांनी त्यांच्या ड्रायव्हरला बोलावले आणि आपले शूज स्वच्छ करुन घेतले. त्यांचा हा फोटो सोशय मीडियावर व्हायरल होत आहे. हे वाचा- उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी खूशखबर! 24 तासांत मान्सून दाखल होणार चीनमध्ये पुन्हा आला कोरोना, बीजिंगमधील अनेक भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन