नवी दिल्ली, 19 जुलै : देशाची राजधानी नवी दिल्लीत आज पावसाचा कहर पाहायला मिळाला. रविवारी सकाळी पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी, दिल्लीत काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे. यातच दिल्लीतील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीतील मुसळधार पावसामुळे आयटीओ जवळच्या अण्णा नगर येथील झोपडपट्टी वाहून गेल्याचे दिसत आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक घरे कोसळली. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा घरात कोणीही उपस्थित नव्हते. घटनास्थळी केंद्रीयकृत अपघात व आघात सेवा (CATS) आणि अग्निशमन दल उपस्थित आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे. मिळालेल्या माहितीनुसार अण्णा नगरमधील नाल्यात मुसळधार पावसामुळे पडझड झाली, त्यामुळे बरीच घरे पडली. आयटीओची डब्ल्यूएचओची एक इमारत आहे. त्याच्या जवळच एक झोपडपट्टी आहे. पावसामुळे झोपडपट्टीत पाणी शिरले आणि बरीच घरं वाहून गेली. तसेच आज सकाळपासून दिल्लीत सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने लोक त्रस्त झाले आहेत. पुरामुळे रस्ते ठप्प झाले आहेत. वाचा- मोडून पडला संसार…! आसाममध्ये पुराचा हाहाकार, मन हेलावून टाकणारे PHOTO
वाचा- PHOTO जंगल गेलं पाण्यात अन् जीव वाचवण्याच्या धडपडीत गेंडा थेट हायवेवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील पावसानंतर ट्विट केले आहे. केजरीवाल यांनी लिहिले आहे की, आज सकाळपासून मी एजन्सीशी संपर्क साधत होतो आणि तेथून पाणी काढण्याच्या प्रक्रियेवर मी नजर ठेवत होतो. आम्ही दिल्लीत अशा आणखी काही ठिकाणी लक्ष ठेवून आहोत. जिथे जिथे पाणी जमा आहे होते तेथे त्वरित पंपाने पाणी उपसले जात आहे.