advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / जंगल गेलं पाण्यात अन् जीव वाचवण्याच्या धडपडीत गेंडा थेट हायवेवर अवतरला पाहा PHOTO

जंगल गेलं पाण्यात अन् जीव वाचवण्याच्या धडपडीत गेंडा थेट हायवेवर अवतरला पाहा PHOTO

आसामच्या काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाचा बहुतांश भाग पुराने वेढला गेला आहे. जीव वाचवण्यासाठी सैलभैर झालेला एकशिंगी गेंडा अचानक नॅशनल हायवेवर आला आणि तिथेच बसकण मारली.

01
हा एकशिंगी गेंड्यांचा (Rhino )अधिवास असलेलं काझिरंगा अभयारण्य अक्षरशः पाण्यात गेलं आहे.

हा एकशिंगी गेंड्यांचा (Rhino )अधिवास असलेलं काझिरंगा अभयारण्य अक्षरशः पाण्यात गेलं आहे.

advertisement
02
NH37 वर शनिवारी दिसलेलं हे दृश्य. एकशिंगी गेंडा जीव वाचवण्याच्या धडपडीत दमून भागून चक्क हायवेवर येऊनच स्थिरावला.

03
तिथून जीव वाचवण्यासाठी धडपडत आलेला हा एकशिंगी गेंडा खूपच दमलेला होता. पशुतज्ज्ञांच्या मदतीने त्याला पुन्हा जंगलाच्या दिशेने सुरक्षित ठिकाणी हाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

04
ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांना पूर आल्याने काझिरंगा नॅशनल पार्क आणि पोबितोरा अभयारण्य पाण्यात गेलं आहे.

05
काझिरंगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या महापुरात 51 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 102 जनावरांना वाचवण्यात वन विभागाला यश आलं आहे.

06
काझिरंगा हा भारतातल्या एकशिंगी गेंड्यांचा (one-horned rhinoceros) एकमेव अधिवास आहे. या दुर्मीळ जातीच्या गेंड्यांना या पुराचा धोका निर्माण झाला आहे.

07
पोबित्रा अभयारण्यातलं एकशिंगी गेंडा आणि त्याचं पिल्लू पुराच्या पाण्यातून वाट काढत उंचावरच्या प्रदेशात पोहोचण्याची धडपड करत आहे.

08
गेंड्यांबरोबरच असंख्य वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आहे. कारण संपूर्ण काझिरंगा पुराच्या पाण्याने वेढलं गेलं आहे.

09
दरवर्षी आसाममध्ये ब्रह्मपुत्रेला पूर आला की काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पुराचा विळखा पडतो.

10
पाण्यात बुडून मरण पावलेल्या रानरेड्याला वनविभागाच्या लोकांनी असं नावेतून उचललं.

11
यावर्षीच्या पुरात काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाचा 95 टक्के भाग पाण्यात गेला आहे. 430 चौरस किमी प्रदेश पुराने वेढला आहे.

12
काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाकडे जाणारा NH-37 हा महामार्ग आता बंद करण्यात आला आहे, कारण या रस्त्यावरही पुराचं पाणी आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • हा एकशिंगी गेंड्यांचा (Rhino )अधिवास असलेलं काझिरंगा अभयारण्य अक्षरशः पाण्यात गेलं आहे.

    MORE
    GALLERIES