JOIN US
मराठी बातम्या / देश / खरी मर्दानी! 4 वर्षांच्या लेकीला वाचवण्यासाठी अपहरणकर्त्यांशी भिडली आई, CCTVमध्ये कैद झाला थरार

खरी मर्दानी! 4 वर्षांच्या लेकीला वाचवण्यासाठी अपहरणकर्त्यांशी भिडली आई, CCTVमध्ये कैद झाला थरार

अपहरणकर्त्यांच्या तावडीतून 4 वर्षांच्या लेकीला आईने असं सोडवलं, धडकी भरवणारा CCTV VIDEO आला समोर.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 जुलै : पूर्व दिल्लीतील शकरपूरमध्ये एका भर दिवसा एका 4 वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मुख्य म्हणजे हे सगळं प्लॅनिंग मुलीच्या काकांनीच केले होते. मात्र मुलीच्या आईने अपहरणकर्त्यांना सळो की पळो करून सोडले. मुलीच्या आईने धैर्य दाखवत आपल्या मुलीला अपहरणकर्त्यांपासून वाचवले. या सगळ्य़ा घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आईने लबाडी दाखवताना तिचा सामना केला. अखेरीस, बदमाशांचा पराभव होतो आणि ते आपल्या आईच्या धैर्याने पळून जातात. हा आवाज ऐकून जमलेल्या शेजा-यांनी अपहरणकर्त्यांचा मार्ग अडवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. तेथून पळ काढताना दरोडेखोरांनी शस्त्रेही लुटले. त्याच्या सुटकेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. मंगळवारी हे प्रकरण सांगितले जात आहे. वाचा- VIDEO: पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये चक्क सायकलवर गस्त घालतोय हा पोलीस अधिकारी शकरपूर भागात घडलेल्या या घटनेत दोन भावांमध्ये व्यवहारावरून वाद होता. परिणाणी या वादातून एका भावाने आपल्याच भावाच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्लॅन रचला. हे काम करण्यासाठी त्याने दोन जणांना विकत घेतले होते. या दोघांनी आधी मुलीच्या आईके पाणी मागितले. जेव्हा महिला पाण्याची बॉटल घेऊन जवळ गेली, तेव्हा त्यांनी तिचा हात पकडला. या महिलेने प्रसंगावधान दाखवत लगेच आपल्या मुलीलाल मागे खेचले आणि ओरडण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. हे दोन्ही अपहरणकर्ते सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. वाचा- 299KM/h वेगानं सुसाट पळवली सुपरबाईक, तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO

वाचा- समुद्र किनाऱ्यावर खेळत होता चिमुरडा मागून आला शिकारी शार्क आणि… दरम्यान, महिलेने आरडाओरडा सुरू केल्यानंतर शेजाऱ्यांनी लगेचच या अपहरणकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने रस्त्याच्या मध्यभागी आपली गाडी लावून अपहरणकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी दुचाकी सोडून पिस्तुल दाखवून पळण्यास सरुवात केली. दुचाकीच्या नंबरवरून मालकाची ओळख पटली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी एका तासाच्या आत या प्रकरणाचा छडा लावला. अपहरणाचे मास्टरमाईंड असलेल्या काकांच्या घरावर छापा मारत त्यांना अटक केली, तर दोन्ही अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या