JOIN US
मराठी बातम्या / देश / राज्याकडूनही पतंजलीला दणका; Coronil ला दिला खोकला-तापाच्या औषधाचा परवाना

राज्याकडूनही पतंजलीला दणका; Coronil ला दिला खोकला-तापाच्या औषधाचा परवाना

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या नोटिसीनंतर आता उत्तराखंड राज्याच्या आयुर्वेद विभागाने पतंजलीला नोटीस पाठवली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

डेहराडून, 24 जून : कोरोनावर प्रभावी औषध कोरोनिल (coronil) आणल्याचा दावा करणाऱ्या पतंजलीच्या (patanjali) समस्येत आता अधिक वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या नोटीसीनंतर आता उत्तराखंड (uttarakhand) राज्याच्या आयुर्वेद विभागानेही पतंजलीला नोटीस बजावली आहे. कोरोना किटसाठी परवानगी मिळाली कशी? कोणत्या आधारावर हा दावा केला जातो आहे?, अशी विचारणा पतंजलीला राज्याच्या आयुर्वेद विभागाकडून करण्यात आली आहे. राज्याच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंजलीला इम्युनिटी बुस्टर, खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना देण्यात आला होता. त्यात कोरोनाव्हायरसचा उल्लेख नव्हता.

संबंधित बातम्या

उत्तराखंडच्या आयुर्वेद विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं, “पतंजलीने आमच्याकडे अर्ज दिला होता, त्यानुसार आम्ही त्यांना परवाना दिला. मात्र त्यांनी कोरोनाव्हायरसचा उल्लेख केला नव्हता. आम्ही इम्युनिटी बुस्टर, सर्दी-खोकला आणि तापाच्या औषधासाठी परवाना मंजूर केला होता. त्यांना कोरोना किट बनवण्यासाठी परवानगी कशी मिळाली, याबाबत आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे” हे वाचा -  कोरोनावर औषध आणणाऱ्या बाबा रामदेवांना दणका, डॉक्टराने गाठले पोलीस स्टेशन! पतंजलीने मंगळवारी कोरोनिल हे औषध लाँच केलं. या औषधामुळे 100% कोरोना बरा होत असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीला नोटीस पाठवली. आपल्याला या औषधाबाबत काहीही माहिती नाही. आधी सविस्तर माहिती द्यावी, तोपर्यंत जाहिरात थांबवा, असे आदेश दिले होते. यानंतर पतंजलीने या औषधाबाबत केंद्र सरकारला पुरावे दिल्याचं आचार्य बालकृष्णन यांनी सांगितलं, त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली. हे वाचा -  केंद्राच्या दणक्यानंतर पतंजलीने दिले हे पुरावे; कोरोना 100 टक्के बरा केल्याचा दावा कोरोनिल औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी करण्यात आली. कोरोनिल औषधाचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे.  69 टक्के कोरोना रुग्ण 3 दिवसांमध्ये बरे झाले तर 100 टक्के कोरोना रुग्ण सात दिवसांमध्ये बरे झालेत, असा दावा रामदेव बाबा यांनी केला.  संपूर्ण नियमांचे पालन करून हे औषध तयार करण्यात आले आहे, अशी माहिती रामदेव बाबांनी दिली. संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या