JOIN US
मराठी बातम्या / देश / 'भाजपचा बिल्ला छातीला लावा', राहुल गांधींकडून पत्रकाराचा अपमान

'भाजपचा बिल्ला छातीला लावा', राहुल गांधींकडून पत्रकाराचा अपमान

खासदारकी रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराच्या प्रश्नानंतर राहुल गांधी यांनी म्हटलं की, तुम्ही थेट भाजपसाठी का काम करताय? हवा निघाली का?

जाहिरात

राहुल गांधी यांची पत्रकार परिषद

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, २६ मार्च : मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी शिक्षा झाल्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली. लोकसभा सचिवालयाने खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर टीका केली. दरम्यान, यावेळी राहुल गांधी हे पत्रकाराच्या एका प्रश्नानंतर भडकल्याचं दिसून आलं. पत्रकाराच्या प्रश्नानंतर राहुल गांधी यांनी म्हटलं की, तुम्ही थेट भाजपसाठी का काम करताय? हवा निघाली का? राहुल गांधी यांना पत्रकार परिषदेवेळी प्रश्न करण्यात आला होता की, राहुलजी न्यायालयाचे जे जमेंट आले आहे त्यावर भाजपने म्हटलं की तुम्ही ओबीसींचा अपमान केला. पूर्ण देशात आंदोलनाची तयारी सुरू आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? पत्रकाराच्या या प्रश्नावर राहुल गांधींनी उत्तर देताना म्हटलं की, तुमचा पहिला अटेम्प्ट तिथून आला आणि नंतरचा इथून. तुम्ही थेट भाजपसाठी का काम करत आहात? थोडं फिरवून विचारा. मी तुम्हाला उदाहरण देतो. राहुलजी तुम्ही जर भाजपसाठी काम करू इच्छित असाल तर भाजपचा लोगो छातीवर लावा. तेव्हा मी तुम्हाला उत्तर देईन. पत्रकार दिसण्याचं नाटक करू नका, हवा निघाली का? अशा शब्दात राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या