JOIN US
मराठी बातम्या / देश / जेवणानंतर सासू-सूनेने सोबत खाल्ले आंबे, एकाचा मृत्यू, PM रिपोर्टमुळे संशय वाढला..

जेवणानंतर सासू-सूनेने सोबत खाल्ले आंबे, एकाचा मृत्यू, PM रिपोर्टमुळे संशय वाढला..

सासू आणि सुनेने दोघांनी जेवणानंतर आंबे खाल्ले होते.

जाहिरात

अर्चना अलेरिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राहुल दवे, प्रतिनिधी इंदूर, 16 जुलै : सासू आणि सून दोघांनी फ्रीजमध्ये ठेवलेले आंबे सोबत खाल्ले होते. मात्र, थोड्या वेळानंतर सूनेची तब्येत खराब झाली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली. मात्र, तिथे तिची प्रकृती आणखी खालावल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं - सासू आणि सून दोघांनी दोन दोन आंबे खाल्ले होते. मात्र, सासूला काहीच झाले नाही. पण सुनेचा मृत्यू झाला. आता चार दिवसांनी शवविच्छेदन अहवालाने काही प्रश्न उपस्थित केले आहे. या अहवालात संशयित विषा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर आता पोलीस याप्रकरणी तपास करत आहे. आंब्यामध्ये काही विषारी पदार्थ होता की, सुनेने विष पिऊन आत्महत्या केली, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

दीड वर्षांपूर्वी लग्न - ही घटना इंदूरच्या बिजलपूर येथील आहे. अर्चना अलेरिया असे मृत सूनेचे नाव आहे. दीड वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मात्र, 8 जुलैला तिची तब्येत अचानक बिघडली. यानंतर तिला जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना आणि तिची सासू दोघांनी जेवणानंतर आंबे खाल्ले होते. त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास, अर्चनाचे डोके दुखू लागले आणि तिला चक्कर येऊ लागले. यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी तिचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे तिच्या सासूला काहीच नाही झाले. आंबे विकणाऱ्याचाही तपास - पोलिसांनी फ्रिजमधील आंब्याला ताब्यात घेतले आहे, तसेच त्याचाही तपास केला जाईल. तसेच आंबे कुणी विकले, याचाही पोलीस शोध घेत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर आंबे खरेदीकर्त्यापासून आंबे विक्रेत्यापर्यंत सर्वांचा तपास केला जात आहे. तसेच पोलीस याप्रकरणी फॉरेन्सिक टीमचीही मदत घेणार आहे. दरम्यान, अजूनपर्यंत माहेरच्या लोकांनी या मृत्यू प्रकरणी मुलीच्या सासरच्या लोकांवर कोणताही आरोप लावलेला नाही. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या