कोटा, 13 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये समाविष्ट असलेल्या पंतप्रधानांच्या गृहनिर्माण योजनेतर भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थानच्या कोटा येथील पीएम आवास योजनेचा सल्लागाराला एसीबी म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर आता या प्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढली आहे. लाच घेण्याचा हा खेळ तळागाळात उघड करण्याचा दावा एसीबी करत आहे. एसीबी एएसपी चंद्रशील ठाकूर म्हणाले की, एसीबी 2017 मध्ये नियुक्त केलेल्या सल्लागार सत्यनारायण मीणा यांची नेमणूक झाल्यानंतर आतापर्यंत मंजूर केलेल्या सर्व अर्जांची चौकशी केली जाईल. एसीबीच्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, सुमारे 517 गृहनिर्माण अर्ज मंजूर झाले असून त्यापैकी 400 अर्जदारांचा पहिला हप्ताही प्राप्त झाला आहे. एसीबीच्या माहितीनुसार 117 अर्जदारांचा पहिला हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. कोटा एसीबीला संपूर्ण योजनेत व्यापक भ्रष्टाचाराची भीती आहे आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्याला पहिला हप्ता मिळाला आहे अशा 400 लोकांनी घरांचे कामदेखील त्यांनी सुरू केलेले नाही. एसीबीला संशय आहे की लाचखोरीचा आरोपी जेईएन जो या योजनेचा सल्लागार होता त्याने यामध्ये बेकायदेशीरपद्धतीने टॅगिंग करुन पैसे मिळवून दिला आहे. एसीबी आता या संपूर्ण प्रकरणात त्या घरांची तपासणी करणार आहे. हे वाचा- पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी कोरोना पॉझिटिव्ह लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी, 30 वर्षांपासून शिकवणाऱ्या शिक्षकांवर मजुरीची वेळ