JOIN US
मराठी बातम्या / देश / Coronavirus Update : हायड्रोक्सीक्लोरोक्वीनबाबत आरोग्य मंत्रालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश

Coronavirus Update : हायड्रोक्सीक्लोरोक्वीनबाबत आरोग्य मंत्रालयाने दिले महत्त्वपूर्ण निर्देश

देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यातही मुंबईत परिस्थिती भीषण आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 मे : देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणाविरोधात मलेरियाचे औषध हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा उपयोग केला जात आहे. याबाबत आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना मंगळवारी निर्देश जारी केले आहे. यामध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपल्याजवळी एचसीक्यूची उपलब्धता आणि विक्रीबाबत अपडेटेड माहिती केंद्राला देण्याचं आवाहन केलं आहे. तर सोमवारी डब्लूएचओ एचसीक्यूच्या ट्रायलवर निर्बंध लावण्यात आले आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार आरोग्य मंत्रालयाने पुढील रणनीती ठरविण्यासाठी निर्देश दिले आहेत. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी आपल्याला सूचिक करू इच्छितो की अनेक राज्य नॅशनल पोर्टवर एचसीक्यूसंबंधित रियलटाइम डाटा अपडेट करीत नाही. मी तुम्हा आग्रह करतो की तुम्ही एचसीक्यूची उपलब्धता आणि विक्रीचा रियलटाइन डाटाची माहिती सातत्याने देत राहावी. यामुळे पुढील रणनीती तयार करण्यासाठी मदत होईल. सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी  एका संशोधनानुसार लक्षण नसलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, पोलीस आदींना एचसीक्यूचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वात जास्त वाढ नोंदविण्यात आली आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या आता लाखाच्या वर गेली आहे. मात्र रिकव्हरी रेट हा जगात सर्वात जास्त आणि मृत्यू दर हा जगात सगळ्यात कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज स्पष्ट केलं. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे असंही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांमध्ये देशात दररोज 1 लाखांपेक्षा जास्त टेस्त होत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. देशात कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण हे 41.61 टक्के आहे. तर मृत्यू दर हा 2.87 टक्के आहे. हे प्रमाण सगळ्यात कमी असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं. कोरोना लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं?  हे वाचा -कंगनाच्या आलिशान प्रॉडक्शन हाऊसचे INSIDE PHOTOS आले समोर, राजेशाही आहे थाट Youtube पाहून रचला पत्नीच्या हत्येचा कट; अत्यंत क्रुरपणे केला खून सोलापूरमध्ये धक्कादायक घटना, ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या