JOIN US
मराठी बातम्या / देश / मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये पोट भरण्यासाठी बेल्टनं मारहाण, वाचा काय घडलं

मुंबईहून निघालेल्या ट्रेनमध्ये पोट भरण्यासाठी बेल्टनं मारहाण, वाचा काय घडलं

श्रमिक एक्स्प्रेसमध्ये जेवणाच्या पाकिटावरून तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सतना स्थानकात खाण्यासाठी वाटण्यात आलेली पाकिटं हिसकावून घेण्यासाठी हे मजूर एकमेकांमध्ये भिडले.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 मे : गेल्या दीड महिन्यापासून कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यादरम्यान लॉकडाऊनमुळे छोटे उद्योगधंदे आणि व्यवसाय ठप्प झाल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे मोठे हाल झाले आहेत. बाहेरच्या राज्यातून आलेल्यांचे गरीब आणि मजुरांना पुन्हा आपल्या गावी जावं असं वाटत होतं. कोरोनामुळे हातातलं काम गेल्यानं त्यांचा उदर्निवाहाचं साधन बंद झालं होतं. अशातच उपाशी असलेल्या मजुरांनी गावची वाट धऱली पण जाताना वाटेत मिळालेल्या खाण्यासाठी तुटून पडल्याचं धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईचं उपनगर असलेल्या कल्यान ते बिहारमधील दानपुरा इथे जाणाऱ्या श्रमिक एक्स्प्रेसमध्ये जेवणाच्या पाकिटावरून तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सतना स्थानकात खाण्यासाठी वाटण्यात आलेली पाकिटं हिसकावून घेण्यासाठी हे मजूर एकमेकांमध्ये भिडले. एकमेकांना बेल्टनं हाणामारी करण्याइतकं हे प्रकरण गेलं. या हाणामारीत अनेक मजूर जखमी झाले आहेत. हा वाद नियंत्रणात आणण्यासाठी GRP जवानांना बोगीमध्ये लाठीचार्ज करावा लागला. हे वाचा- BREAKING:राज्यात कोरोनामुळे 5 पोलिसांचा मृत्यू तर 531 कर्मचाऱ्यांना लागण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मजुरांना खाण्यापिण्याची समस्या होऊ नये म्हणून सतना स्टेशनवर मजुरांसाठी खाद्यपदार्थांचे पॅकेट्स देण्याची व्यवस्था केली होती. जेव्हा ही एक्स्प्रेस स्थानकात आली तेव्हा कामगारांना ही खाण्याची पाकिटं देण्यासाठी तरुण पुढे सरसारवले मात्र भुकेलेल्या मजुरांनी पाकिटं हिसकवून घेण्यास सुरुवात केली. त्यातून वादाला तोंड फुटलं आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. 1 मेपासून 115 भारतीय रेल्वेनं श्रमिक आणि मजुरांसाठी जवळपास 115 गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाता येईल यासाठी ही सोय करण्यात आली आहे. सध्या देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सध्या 17 मेर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरीही पुढेही हा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे, छोटे व्यवसाय, व्यापारी आणि मजुरांचं मोठं नुकसान झालं आहे. गरीब आणि मजुरांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे वाचा- नितेश राणेंनी समोर आणला सायन हॉस्पिटलमधील धक्कादायक VIDEO,वार्डात मृतदेहच मृतदेह संपादन- क्रांती कानेटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या